

ऋषिता तावडे
अलिबाग : भारतीय पर्यटनाला नवी दिशा देणारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रूझ टर्मिनल सुरू झाले असून, सिंगापूर, मलेशिया, थायलंड, दुबई, मालदीव, श्रीलंका, लक्षद्वीप, कोची आणि गोवा अशा नऊ पर्यटन स्थळांची सफर या क्रूझ सेवेतून होणार आहे. एकूण पाच क्रूझ मुंबईच्या टर्मिनलवर एकाचवेळी पार्क होऊ शकणार आहेत. या सेवेमुळे देशांतर्गत आणि परदेशी पर्यटनालाही मोठी चालना मिळू शकेल. दरवर्षी 10 लाख प्रवासी येथून प्रवास करतील, अशी अपेक्षा आहे.
देशातील सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल मुंबई येथे सुरू झाला आहे. या टर्मिनलवर एकाचवेळी 5 क्रूझ पार्क होण्याची क्षमता आहे. या आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलमधून मुंबईतून गोवा, कोची, लक्षद्वीप, श्रीलंका, मालदीव, दुबई, सिंगापूर, मलेशिया, थायलंड अशा ठिकाणी क्रूझेसने पर्यटनाला जाता येईल. या क्रूझमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटनाच्या सुविधा देण्यात आल्या असून, या क्रूझ टर्मिनलचे पहिले दोन मजले 2 लाख 7 हजार स्क्वेअर फूट असणार आहेत. त्यामुळे पर्यटकांना सर्व प्रकारच्या सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत.
मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल असे या टर्मिनलचे नाव आहे. यासाठी 556 कोटी खर्च करण्यात आले आहेत. समुद्राच्या लाटांना सामना करण्यासाठी क्रूझची रचना छतासारखी करण्यात आली आहे. भारताच्या क्रूझ पर्यटन क्षेत्राला मोठी चालना देणारा असा हा प्रकल्प आहे. एमआयसीटी हे भारतातील सर्वात मोठे जागतिक दर्जाचे क्रूझ टर्मिनल आहे. या क्रूज टर्मिनलचे पहिले दोन मजले 2,07,000 चौरस फूट क्षेत्रात पसरलेले आहेत.
प्रवास गंतव्ये : गोवा, कोची, लक्षद्वीप, श्रीलंका, मालदीव, दुबई, सिंगापूर, मलेशिया, थायलंड
क्षमता : 10 लाख प्रवासी दरवर्षी, एका दिवसात 15 हजार पर्यटक. एकाचवेळी 5
सुविधा : 72 चेक-इन व इमिग्रेशन काऊंटर, 22 लिफ्ट, 10 एस्केलेटर, 300 हून अधिक गाड्यांसाठी पार्किंग, सेल्फी पॉईंटस् व खास आसन व्यवस्था
बांधकाम : 4.15 लाख चौरस फूट क्षेत्रफळ 2 मजले, 2.07 लाख स्क्वेअर फूट सुविधा क्षेत्र 556 कोटींचा प्रकल्प खर्च
1. जहाजावरच हॉटेल, भोजन, मनोरंजन, वाहतूक यांसह लक्झरी रिसॉर्टसारखा अनुभव
2. थिएटर शो, डिस्को, कॅसिनो, स्विमिंग पूल, स्पा, योगा, जिम सुविधा
3. स्कूबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंग, डॉल्फिन स्पॉटिंगसारखी अॅडव्हेंचर टूर
4. एका प्रवासात अनेक देश व संस्कृती अनुभवण्याची संधी
5. आंतरराष्ट्रीय सुरक्षा मानके, डॉक्टर्स व हेल्थ सेंटर उपलब्ध