आंबेनळी घाटात भीषण दुर्घटना; ७०० फूट दरीत कोसळून दांपत्याचा मृत्यू, बचावकार्याला पावसाचा अडथळा

Raigad accident | रेस्क्यू टीम चे पावसात युद्धपातळीवर मुतदेह बाहेर काढण्याचे शर्तीचे प्रयत्न
आंबेनळी घाटात भीषण दुर्घटना; ७०० फूट दरीत कोसळून दांपत्याचा मृत्यू, बचावकार्याला पावसाचा अडथळा
Published on
Updated on

पोलादपूर : पोलादपूर महाबळेश्वर मार्गावरील पोलादपूर हद्दीतील आंबेनळी घाटात घडलेल्या भीषण अपघातात बाईकस्वार दांपत्याचा सुमारे ७०० फूट खोल दरीत कोसळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना 23 एप्रिल 26 च्या सायंकाळी घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून घाटातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आंबेनळी घाटातील एका अतिधोकादायक वळणावर स्प्लेंडर बाईक बॅरिकेट्समध्ये अडकलेल्या अवस्थेत आढळून आली. या घटनेवरून बाईकवरील प्रवासी दरीत कोसळल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. यानंतर तात्काळ प्रतापगड रेस्क्यू टीम आणि महाबळेश्वर ट्रेकर्सचे सदस्य घटनास्थळी दाखल झाले आणि युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू करण्यात आली.

शोधकार्यादरम्यान सुमारे ७०० फूट खोल दरीत संबंधित दांपत्याचा मृत अवस्थेत शोध लागला. मृतांची ओळख मोहन चव्हाण (वय ५५) आणि जयश्री चव्हाण (वय ४८, रा. सोनगिरवाडी) अशी झाली आहे. या दुर्घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून स्थानिक स्तरावर शोककळा पसरली आहे.

दरम्यान, घटनास्थळी अवकाळी पाऊस आणि दाट धुके यामुळे बचावकार्य अत्यंत कठीण बनले आहे. निसरड्या उतारांमुळे आणि कमी दृश्यमानतेमुळे रेस्क्यू टीमला मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे. प्रतापगड रेस्क्यू टीम आणि महाबळेश्वर ट्रेकर्सचे जवान जीव धोक्यात घालून मृतदेह बाहेर काढण्याचे शर्तीचे प्रयत्न करत आहेत.

या घटनेत पोलादपूर पोलीस आणि महाबळेश्वर पोलीस यंत्रणेनेही तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्याला हातभार लावला आहे. स्थानिक प्रशासन, पोलीस आणि स्वयंसेवी संस्थांच्या समन्वयातून संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. आंबेनळी घाट हा अत्यंत धोकादायक वळणांचा आणि खोल दऱ्यांचा घाट म्हणून ओळखला जातो. विशेषतः पावसाळ्यात रस्ता घसरडा होत असल्याने अपघातांची शक्यता अधिक वाढते. त्यामुळे वाहनचालकांनी या मार्गावरून प्रवास करताना वेग मर्यादित ठेवावा, सतर्कता बाळगावी आणि नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news