Contaminated Water Supply: अंबा नदीचे पाणी वाळूउपशामुळे प्रदूषित; पालीत नागरिकांचे आरोग्य धोक्यात

पालीत नळांना जंतूयुक्त पाणीपुरवठा
Contaminated Water Supply
Contaminated Water SupplyPudhari
Published on
Updated on

संतोष उतेकर

सुधागड: अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली शहरात पाणी पुरवठ्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे शहरातील धुंदीविनायक नगर भागात नळांना चक्क जंतुयुक्त काळे कुठे आणि दुर्गंधीयुक्त पाणी असल्याने नागरिकांमध्ये भीती व संतापांचे वातावरण पसरले आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हजारो भाविक आणि स्थानिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सध्या अंबा नदीचे पात्र रसायनयुक्त सांडपाणी कचरा आणि वाळू उपशामुळे प्रदूषित झाले आहे.

Contaminated Water Supply
Raigad news | रेल्वे संरक्षण दलाच्यावतीने ५८४ मुले आणि ८५ प्रौढ व्यक्तींना कुटुंबाकडे सुपूर्द

27 कोटींची योजना लाल भीतीत

पालीची लोकसंख्या आणि येथे येणारे हजारो भावी लक्षात घेता 27 कोटी रुपयांची शुद्ध पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे मात्र ही योजना अद्यापही तांत्रिक कारणास्तव लाल भीतीत अडकली आहे परिणामी शुद्ध करणविना थेट अंबा नदीचे पाणी नळाद्वारे पुरवले जात असल्याने नळांतून अनेकदा जिवंत साप किडे आणि चिखल बाहेर येण्याची प्रकार घडले आहेत

नदीला प्रदूषणाचा विळखा

नदीपात्रात कंपनीचे रसायुक्त पाणी आणि शहराचे सांडपाणी थेट सोडले जात आहे तसेच निर्माण कचऱ्यामुळे पाणी कुजून ज्याला दुर्गंधी येते आणि याचं दूषित परिणामाचा पुरवठा शहरात होत असल्याने जलजन्य आजारांची टांगती तलवार नागरिकांवर आहे

Contaminated Water Supply
Dry Fish Price: सुक्या मासळीसाठी खवय्यांची गर्दी; पाली बाजारात भाव स्थीर

कोट धुंदी विनायक नगर भागात नळाला अत्यंत दूषित पाणी आले आहे अशुद्ध पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर आहे प्रशासनाने केवळ आश्वासने न देता तात्काळ शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा

- राहुल महाजन, स्थानिक नागरिक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news