Mumbai Pune Expressway Missing Link | मुंबई–पुणे द्रुतगतीवरील ‘मिसिंग लिंक’चे शुक्रवारी लोकार्पण: प्रवास होणार अधिक जलद, सुरक्षित

CM Devendra Fadnavis | मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते होणार उद्घाटन
 Mumbai Pune Missing Link Inauguration
Mumbai Pune Expressway Missing LinkPudhari
Published on
Updated on

Mumbai Pune Missing Link Inauguration

पनवेल : मुंबई–पुणे दरम्यानच्या वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणारा ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प खुला होणार आहे. या मार्गाचे लोकार्पण शुक्रवारी (दि. १) दुपारी १२:३० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. हा सोहळा मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग वरील पूल क्र.१, खोपोली एक्झिटजवळ ( जि. रायगड) येथे पार पडणार आहे.

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचीही उपस्थिती राहणार आहे. याशिवाय उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ हा प्रकल्प विशेषतः खोपोली घाट परिसरातील धोकादायक वळणांना पर्याय म्हणून उभारण्यात आला आहे. या प्रकल्पात बोगदे (टनेल) आणि उंच पूल (व्हायडक्ट) यांचा समावेश आहे. यामुळे घाटातील वळणदार रस्ता टाळता येणार आहे.

परिणामी, प्रवासाचा वेळ सुमारे २० ते २५ मिनिटांनी कमी होणार असून अपघातांचे प्रमाणही घटण्याची अपेक्षा आहे. ‘मिसिंग लिंक’मुळे वाहनचालकांना अधिक सरळ, सुरक्षित आणि जलद मार्ग उपलब्ध होणार आहे. विशेषतः पावसाळ्यात घाटातील वाहतुकीत होणाऱ्या अडचणी कमी करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. मुंबई–पुणे दरम्यान रोज होणाऱ्या मोठ्या वाहतुकीचा ताण कमी करण्यासही या प्रकल्पाची मदत होणार आहे.

राज्याच्या पायाभूत सुविधांच्या दृष्टीने ‘मिसिंग लिंक’ हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात असून, यामुळे आर्थिक आणि औद्योगिक दळणवळणाला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

प्रकल्पाची माहिती

प्रकल्प : मुंबई–पुणे ‘मिसिंग लिंक’

लांबी. : सुमारे १३.३ किमी

सुरुवात: खोपोली (खालापूर) एक्झिट परिसर

शेवट. : सिंहगड इन्स्टिट्यूट परिसर, लोणावळा

बोगदे. : २ प्रमुख बोगदे

मुख्य बोगदा: सुमारे ८.९ किमी

दुसरा बोगदा: सुमारे १.९ किमी

पूल (व्हायडक्ट): २ उंच पूल

खर्च: अंदाजे ₹६,६९५ कोटी

प्रकल्पाची वैशिष्ट्ये

खंडाळा घाट पूर्णपणे बायपास

प्रवासाचा वेळ २०–३० मिनिटांनी कमी

अंतर सुमारे ५–६ किमीने कमी

आधुनिक बोगदे (वेंटिलेशन, सीसीटीव्ही, अग्निशमन यंत्रणा)

टायगर व्हॅली परिसरात उंच केबल-स्टे ब्रिज

अपघातप्रवण घाट मार्ग टाळल्याने सुरक्षितता वाढणार

वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news