Chameleons | आता मी हिरवा, आता मी पिवळा..माणगावात आला शॅमेलिअन

माणगांवच्या समृद्ध जैवविविधतेवर पुन्हा शिक्कामोर्तब
Chameleons
काही सेकंदात पिवळा तर काही सेकंदात हिरव्या पानात सामावून घेत आपला हिरवा रंग करून घेणारा शॅमेलिअन टिपला आहे वन्यप्राणी अभ्यासक शंतनु कुवेसकर यांनी. छाया : शंतनु कुवेसकर
Published on
Updated on
रायगड ः जयंत धुळप

भारतातील एकमेव रंग बदलणारा सरडा अशी आगळी ओळख असणारा गिरगिट म्हणजेच शॅमेलिअन. परतीच्या पावसात माणगांवमधील निसर्ग हिरवाईत बुधवारी दर्शन दिले आहे. वन्यप्राणी अभ्यासक शंतनु कुवेसकर यांनी या शॅमेलिअनला आपल्या कॅमेरात चित्रीत करुन त्यांच्या अस्तित्वाची नोंद केली आहे. काही सेकंदात आता मी पिवळा, आता मी हिरवा..माणगावात आला शॅमेलिअन असेच म्हणता येईल.

गेल्या काही दिवसांपूवीर्र् माणगांवच्या जंगलात रानकुत्र्यांच्या कळपाची नोंद झाली तर काळ नदित पाणमांजरे दिसून आली. आता रंग बदलणार्‍या सरड्याने दर्शन देऊन येथील समृद्ध जैवविविधतेवर या शिक्कामोर्तब केले आहे. रंग बदलणार्‍या या सरड्या बद्दल वन्य प्राणी अभ्यासकांमध्ये मोठे औत्सूक्य असते. शॅमेलिअनचे वास्तव्य भारतीय उपखंडामध्ये सर्वत्र आहे. महाराष्ट्रात देखील हे गिरगिट सगळीकडे आढळून येतात परंतु झाडांच्या पानांमध्ये रंग बदलून लपून राहण्याच्या कलेमुळे फार क्वचित दुर्मिळते नजरेस पडतात, अशी माहिती या निमित्ताने बोलताना वन्यप्राणी अभ्यासक शंतनु कुवेसकर यांनी दिली आहे.

जून ते ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात शॅमेलिअनचा प्रजनन कालावधी असतो. या कालावधीतच ते जमिनावर येत असल्यामुळे हे गिरगिट सर्वात जास्त या काळात दिसून येऊ शकतात. शॅमेलिअनला कॅमेलिअन म्हणून देखील संबोधले जाते असे कुवेसकर यांनी सांगीतले.

गैरसमजातून होणारी हत्या थांबवावी

रंग बदलणारे हे सरडे मुख्यतः किटभक्षी असतात आणि प्रजननाचा काळ सोडून जवळपास आपले संपूर्ण आयुष्य झाडांमध्ये किंवा छोट्या झुडुपांमध्ये घालवतात.अतिशय गरीब व मानवासाठी निरुपद्रवी असलेला हा सरपटणारा जीव बिनविषारी आहे. मात्र गैरसमजातून आणि चुकून त्याला विषारी चापाडा (बांबू पिट वायपर) समजून त्याची हत्या करण्यात येते, ती थांबवावी असे आवाहन शंतनू कुवेसकर यांनी या निमीत्त्ताने केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news