

रोहे, पुढारी वृत्तसेवा : मध्य रेल्वेने उन्हाळी हंगामात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन आपल्या नियमित गाड्यांव्यतिरिक्त आजपर्यंत २७८ अनारक्षित गाड्यांसह ९८६ उन्हाळी विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. मध्य रेल्वेने यापूर्वी उन्हाळी विशेष गाड्यांच्या ८५४ सेवांची घोषणा केली होती आणि आता प्रवाशांच्या सेवेसाठी १३२ अतिरिक्त गाड्या सोडण्यात येणार आहे.
01049 साप्ताहिक विशेष गाडी दिनांक ५.०४.२०२५ ते दिनांक २८.०६.२०२५ पर्यंत दर शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री ११.०५ वाजता सुटेल आणि खोरधा रोड येथे तिसऱ्या दिवशी ००.५५ वाजता पोहोचतील. (१३ सेवा)
01050 साप्ताहिक विशेष दिनांक ७.०४.२०२५ ते दिनांक ३०.०६.२०२५ पर्यंत दर सोमवारी खोरधा रोड येथून दुपारी २.३० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी १२.५५ वाजता पोहोचेल. (१३ सेवा)
थांबे: दादर, कल्याण, लोणावळा, पुणे, दौंड, कुर्डुवाडी, सोलापूर, कलबुरगि, वाडी, विकाराबाद, सिकंदराबाद, गुंटूर, विजयवाडा जंक्शन, राजमंड्री, सामलकोट जंक्शन. पिठापुरम, दुव्वाडा, कोत्तवलसा विजयनगरम, श्रीकाकुलम रोड, पलासा, ब्रह्मपुर आणि बालुगांव
01065 साप्ताहिक विशेष दिनांक १०.०४.२०२५ ते ०१.०५.२०२५ पर्यंत दर गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ११.०५ वाजता सुटेल आणि नारंगी येथे तिसऱ्या दिवशी ११.०० वाजता पोहोचेल. (४ सेवा)
01066 साप्ताहिक विशेष दिनांक १३.०४.२०२५ ते ०४.०५.२०२५ पर्यंत दर रविवारी नारंगी येथून सकाळी ०५.२५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे तिसऱ्या दिवशी सकाळी ०८.२५ वाजता पोहोचेल. (४ सेवा)
थांबे: दादर, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, पिपरिया, जबलपुर, कटनी, सतना, माणिकपुर, प्रयागराज छिवकी, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापुर, पाटलीपुत्र, हाजीपुर, बरौनी, बेगूसराय, खगड़िया, नवगछिया, कटिहार, किशनगंज, अलुबारी रोड, न्यू जलपाईगुड़ी, न्यू कौचिबिहार, कोकराझार, न्यू बोंगाईगांव, रंगिया कामाख्या आणि गुवाहाटी
02188 साप्ताहिक अतिजलद विशेष दिनांक ११.०४.२०२५ ते २७.०६.२०२५ पर्यंत दर शुक्रवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दुपारी १३.३० वाजता सुटेल आणि रीवा येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ९.४५ वाजता पोहोचेल. (१२ सेवा)
02187 साप्ताहिक अतिजलद विशेष दिनांक १०.०४.२०२५ ते दिनांक २६.०६.२०२५ पर्यंत दर गुरुवारी रीवा येथून दुपारी ३.५० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी दुपारी १२.२० वाजता पोहोचेल. (१२ सेवा)
थांबे: दादर, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, हरदा, इटारसी, पिपरिया, गदरवाडा, नरसिंहपुर, जबलपुर, कटनी, मैहर आणि सतना.
संरचना: एक प्रथमसह द्वितीय वातानुकूलित, एक द्वितीय वातानुकूलित, ४ तृतीय वातानुकूलित, शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड्स ब्रेक व्हॅन.
01405 साप्ताहिक विशेष दिनांक ०६.०४.२०२५ ते दिनांक २७.०४.२०२५ पर्यंत दर रविवारी श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर येथून सकाळी ०९.३५ वाजता सुटेल आणि कटिहार येथे तिसऱ्या दिवशी सकाळी ०६.१० वाजता पोहोचेल. (४ सेवा)
01406 साप्ताहिक विशेष दिनांक ०८.०४.२०२५ ते दिनांक २९.०४.२०२५ पर्यंत दर मंगळवारी कटिहार येथून १८.१० वाजता सुटेल आणि श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर येथे तिसऱ्या दिवशी १५.३५ वाजता पोहोचेल. (४ सेवा)
थांबे: मिरज, सांगली, कराड, सातारा, पुणे, दौंड चोर केबिन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपुर, कटनी, सतना, मानिकपुर, प्रयागराज छिवकी, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापुर, पाटलीपुत्र, हाजीपूर, बरौनी, बेगूसराय, खगड़िया आणि नवगछिया
01429 द्वि-साप्ताहिक विशेष दिनांक ७.०४.२०२५ ते दिनांक २८.०४.२०२५ पर्यंत दर सोमवार आणि शुक्रवारी लातूर येथून सकाळी ९.३० वाजता सुटेल आणि हडपसर येथे त्याच दिवशी १५.३० वाजता पोहोचतील. (७ सेवा)
01430 द्वि-साप्ताहिक विशेष दिनांक ७.०४.२०२५ ते दिनांक २८.०४.२०२५ पर्यंत दर सोमवार आणि शुक्रवारी हडपसर येथून दुपारी ४.०५ वाजता सुटतील आणि लातूर येथे त्याच दिवशी रात्री २१.२० वाजता पोहोचेल. (७ सेवा)
थांबे: हरंगुळ, उस्मानाबाद, बारसी टाउन, कुर्डुवाडी, जेऊर आणि दौंड.
01668 साप्ताहिक विशेष दिनांक ११.०४.२०२५ ते दिनांक २७.०६.२०२५ पर्यंत दर शुक्रवारी हडपसर येथून सकाळी ६.३० वाजता सुटेल आणि राणी कमलापती येथे त्याच दिवशी रात्री २२.५५ वाजता पोहोचेल.
(१२ सेवा)
01667 साप्ताहिक विशेष दिनांक १०.०४.२०२५ ते दिनांक २६.०६.२०२५ पर्यंत दर गुरुवारी राणी कमलापती येथून सकाळी ८.३५ वाजता सुटेल आणि हडपसर येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ००.३० वाजता पोहोचेल. (१२ सेवा)
थांबे: दौंड कॉर्ड केबिन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, हरदा, इटारसी आणि नर्मदापुरम.
09323 पुणे - इंदूर साप्ताहिक विशेष, पूर्वी दिनांक २०.०३.२०२५ पर्यंत चालविण्यासाठी सूचित केली होती, आता दिनांक २७.०३.२०२५ पासून दिनांक २६.०६.२०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे. (१४ सेवा)
09324 इंदूर - पुणे साप्ताहिक विशेष, पूर्वी दिनांक १९.०३.२०२५ पर्यंत चालविण्यासाठी सूचित केली होती, आता दिनांक २६.०३.२०२५ पासून दिनांक २५.०६.२०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे. (१४ सेवा)
विशेष सेवा चालण्याच्या दिवसांमध्ये, वेळेत, संरचना आणि थांब्यांमध्ये कोणताही बदल होणार नाही.
विशेष ट्रेन क्रमांक 01049, 01065, 02188, 01405, 01429, 01430 आणि 01668 चे बुकिंग दिनांक ३१.०३.२०२५ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.
विशेष ट्रेन क्रमांक 09323/09324 च्या विस्तारित सेवांसाठी विशेष शुल्कासह बुकिंग आधीच सुरू आहे.
अतिजलद मेल / एक्सप्रेस ट्रेनसाठी लागू असलेल्या अनारक्षित साठी सामान्य शुल्कासह अनारक्षित कोचसाठी तिकिटे यूटीएस द्वारे बुक करता येतात.
तपशीलवार वेळापत्रक आणि थांब्यांसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस ॲप डाउनलोड करा.