Cable Stayed Sky Bridge | केबलस्‍ट्रेट स्काय ब्रिजमुळे ५० किमीने घटणार कोकण-महाबळेश्वर अंतर

कोयनेच्या बॅकवॉटरमध्‍ये ५४० मीटर लांबीचा पूल आकाराला येतोय; रायगडमधील २१ गावांना मिळणार नवा जीवनमार्ग
Cable Stayed Sky Bridge |
Cable Stayed Sky Bridge | केबलस्‍ट्रेट स्काय ब्रिजमुळे ५० किमीने घटणार कोकण-महाबळेश्वर अंतर
Published on
Updated on

ऋषिता तावडे

रायगड : रायगड जिह्यातील पोलादपूरमधील डोंगराच्‍या कुशीत विसावलेल्‍या आणि विकासापासून दूर असलेल्‍या २१ गावांना आता नवा जीवनमार्ग मिळणार आहे. कोकण-पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या खेड ते महाबळेश्‍वर  या मार्गावरील केबलस्‍ट्रेट स्‍काय ब्रिज पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करत आहे. यासाठी १७५ कोटी रुपये खर्च झाला असून हा मार्ग ५४० मिटर लांब आहे. हा मार्ग साताऱ्यातील पाचगणी, महाबळेश्वर, तसेच रायगडमधील पर्यटनस्थळांना जोडण्यात आल्याने या भागातील पर्यटन बहरणार आहे. तथापि, या मार्गामुळे रायगड जिल्ह्यातील २१ गावे मुख्य प्रवाहात येतील.

रायगड हा पर्यटन जिल्‍हा म्‍हणून गेली १५ वर्षे वेगाने विकसित होत आहे. विस्‍तीर्ण सागरी किनारे, ऐतिहासिक किल्‍ल्यांचा वारसा आणि पुरातन मंदिरांची जोड यामुळे पर्यटना आलेख उंचावत आहे. आता या नव्‍या मार्गामुळे रायगड ते महाबळेश्‍वरचे अंतर ५० किमीने कमी होणार आहे. याबरोबरच कोयना बॅकवॉटरच्‍या आजूबाजूची गावे पर्यटनदृष्ट्या विसित होतील. कोकणातून महाबळेश्‍वरला जायच म्‍हटले की, आंबेनळी घाटतील धुके, अरुंद वळण आणि दरडी कोसळण्याचा धोका नेहमीच असतो. मात्र, आता सह्याद्रीच्या कुशीत साकारणार्‍या केबलस्‍ट्रेट स्‍काय ब्रिजमुळे कोकण आणि पश्‍चिम महाराातील नागरिकांची वाहतूक सुविधायुक्त होणार आहे.

कोयना धरणाच्‍या बॅकवॉटर परिसरातील रायगड जिल्ह्यातील २१ गावे गेली ६० वर्षे खडतर प्रवास करत आहेत. बोटीशिवाय त्यांना मुख्‍य प्रवाहापर्यंत पोहोचता येत नव्हते. मात्र, अनेक दशकांच्‍या प्रतीक्षेनंतर या नव्‍या ब्रिजमुळे ही २१ दुर्गम गावे मुख्‍य प्रवाहात येणार आहेत. येथील आंबा, काजू, मासळीला सहज-सुलभ बाजार मिळेल. महाबळेश्‍वर-खेड-दापोली या सोप्‍या मार्गाने जोडले जाील. मुंबईतील वांद्रे-वरळी सिलिंकशी साधर्म्य सांगणारा हा पूल कोयना धरणाच्‍या बॅकवॉटरवर बांधण्‍यात आला आहे. तब्‍बल १७५ कोटी रूपयांचा खर्च ५४० मीटर लांबी आणि १४ मी रूंदी या आकडेवारीमुळे प्रकल्‍पाची भव्‍यता दिसते. पण प्रकल्‍पाच्‍या मध्‍यभागी उभारलेली ४३ मीटर उंचीची गॅलरी त्‍याच्‍या आकर्षण ठरत आहे. 

स्काय ब्रिजमुळे उदयास येणार नवे पर्यटन

पश्‍चिम महाराष्‍ट्रात अशा सुविधा असलेला हा पहिलाच हा पूल असेल. स्काय ब्रिजपर्यंत पोहोचण्‍यासाठी कॅप्‍सूल लिफ्‍ट आणि जिने उपलब्‍ध आहेत. एका बाजूला अथांग कोयनेचे बॅकवॉटर, तर दुसर्‍या बाजुला सह्याद्रीच्या हिरव्यागार पर्वतरांगा. सुर्योदय आणि सुर्यास्‍ताचवेळी हे दृष्‍य पाहणे हा अनुभवच वेगळाच राहील. हा पूल वाहतुकीसह नवे पर्यटनस्‍थळ म्हणून उदयास येईल. पूलाचा सर्वात जास्‍त फायदा तर २१ दुर्गम गावातील नागरिकांना होणार आहे. 

दृष्टीक्षेपात ब्रिज

१७५ कोटी रुपये खर्च, ५४० मीटर लांब 

५४० मीटर लांबी आणि १४ मीटर रूंदी

४३ मीटर उंचीची गॅलरी खास आकर्षण

५० किमीने घटणार कोकण-महाबळेश्‍वर अंतर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news