

रायगड जिल्ह्यातील घटत चाललेले शेती क्षेत्र आणि वाढते औद्योगिकरण यामुळे पारंपरिक बैलगाडी हे ग्रामीण भागातील वाहन आता अडगळीत पडत चालले आहे. बैलगाडी शैर्यत शौकीनांकडे बैलगाडी दिसून येते. शिवाय मिठागरांमधून मीठ विक्री करणारे बैलगाडीतून मीठ विक्रीकरीता बैलगाडी वापर करताना दिसतात.
पुरातन काळापासून दळणवळणासाठी बैल गाडीचा उपयोग संपूर्ण भारतात होत होता. ज्यांच्या घरी बैलगाडी होती ते एक प्रतिष्ठित आणि श्रीमंत व्यक्तीत गणले जात तसेच ते घर ही गावामध्ये श्रीमंत कुटुंब म्हणून ओळखले जात होते. गावातील अनेक कामे बैलगाडीच्या सहाय्याने केली जात होती. जसे भात वाहतूक, शेतीच्या कामासाठी जसा बैलांचा उपयोग होत होता तसाच गाडीचाही उपयोग शेतकरी करत असत, तसेच गरजेच्या दळणवळणासाठी सदर गाडीचा उपयोग होत होता. तर अनेक चित्रपटात बैलगाडी दाखवण्यात येत होती जसे की 1972 साली आलेला मराठी चित्रपट पिंजरा यात लावण्यांचे फड या गावातून त्या गावात ने आणण्यासाठी या बैलगाडीचा उपयोग दाखवण्यात आला आहे तसेच दूरचित्रवाणीवर सारज्या राज्या ही सिरीयल दाखवण्यात आली ज्यात गाडीचे महत्व अधोरेखित करण्यात आले आहे. त्यामुळे बैलगाडीची श्रीमंती अधोरेखित होत होती.
2000 पासून झपाट्याने जग बदलत गेले तसतसे या गाडीचा उपयोग बंद होत गेला, जस जसे शहरीकरण होत गेले तस तसे या गाडीची जागा यंत्र गाडीने कधी घेतली हे समजून आलेच नाही त्यामुळे बैलगाडी कधी अडगलीत गेली हे त्या गाडी मालकांना आणि तेथील जनतेला समजलेच नाही. आजच्या नवीन पिढीला बैलगाडी एकतर चित्रांमधून किव्वा दुर्गम भागात गेल्यावरच पाहायला मिळणार आहे. जशी बेलगाडी अडगळीत गेली तसे बैलांचीही वाताहत होत गेली. त्यामुळे बैलांना आसरा ही मिळेनासा होत गेला आहे. तर बैलगाडीची कामे करणारे ही काम नसल्याने त्यांचाही व्यवसाय बंद होत गेला. त्यामुळे कामगार देशोधडीला लागले आहेत.
2000 सालानंतर जन्मलेल्या बर्याच मुलांना आता तो आनंद घेता आलाच नाही. जे 1980 किंवा त्या अगोदरील दशकात जन्मलेल्या जनतेने घेतले आहे, जसे की त्यावेळची मुले ही बैलगाडीच्या मागे मागे धावात असत आणि कधी आपणाला या गाडीची सवारी करायला मिळणार, त्यामुळे तेव्हाची मुलेही खर्या अर्थाने फारारी की सावरी करत असत. सध्या पर्यटन क्षेत्रात बैलगाडीचे महत्व वाढत आहे. काहीजण हौस म्हणून बैलगाडीत बसत आहेत.