Bor Ghat heavy traffic issue
अवजड वाहतूक बेततेय बोरघाटाच्या मुळावरpudhari photo

Bor Ghat heavy traffic issue : अवजड वाहतूक बेततेय बोरघाटाच्या मुळावर

अनेक अपघातांनी गेले निष्पांपाचे बळी , हजारो जायबंदी,वाहतूक कोंडीची समस्या
Published on

खोपोली शहर : दिलीप जाधव

देशाची आर्थिक राजधानी मुंबईला जोडणार्‍या मुंबई -पुणे द्रुतगती महामार्गावरील बोरघाटात सातत्याने होणार्‍या अपघातांत निष्पाप बळी जात असल्याने चिंतेचा विषय बनला आहे. घाटात रम्बल स्टिप, स्पिड ब्रेकर, रात्रभर प्रकाशासाठी हायमास्ट, वाहतूक नियम मोडणार्‍या, अतिवेगवान वाहनांवर दंडात्मक कारवाई, अशा अनेक उपाययोजना केल्या तरी अपघातांचे प्रमाण घटता घटत नाही. त्यामधे अवजड वाहन चालक इंधन वाचविण्यासाठी घाटात वाहने न्युटल करुन उतरतं असताना ब्रेक फेल होऊन अपघात घडत आहेत.

खोपोली बायपास ते ढेकू फुडमॉल या 3 किमी अंतरात एका वर्षात 16 प्राणघातक अपघातात 12 ठार तर 61 जण जायबंदी झाले तसेच तब्बल 60 वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अवजड वाहनांचे ब्रेक फेल होऊन पुढे जाणार्‍या कार बस टेम्पो यांसारखी हलकी वाहने चक्काचूर करीत निष्पाप जीवांचा बळी घेत आहेत.

मागील आठवड्यात ट्रेलर क्र. एच.एच.46/बी.यु.3506 खोपोली बायपास ते फुडमॉल या 3 किमी अंतरात समोर येणार्‍या वाहनांना चिरडले या घटनेत तब्बल 25 वाहनांना धडक दिली तर एका महीलेला आपला प्राण गमवावा लागला असुन 19 जण गंभीर जखमीं झाले. तर जुन्या महामार्गावर मॅजीक पॉईट एच ओ सी ब्रिज खाली लोखंडी पाईप अवजड माल घेऊन जाणार्‍या ट्रक मधील पाइप कारमध्ये घुसुन 1 महिला ठार तर काही पाईप अँक्टीव्हा मोटार सायकलवर पडुन 1 महिला असे 2 महिला ठार तर 5 जखमी झाले. तर याच परिसरात कार वर ट्रक आदळल्याने कार मधील 1 महीला ठार तर 3 जण गंभीर जखमीं झाले. जखमी मधे लहान मुलीचास मावेश होता. अवजड वाहने लोणावळा खंडाळा इथून बोरघाटात उतरत असताना ब्रेक मारत मारत येत असल्याने दहा-बारा किलोमीटर अंतर होते.

वाहनांचे लायनर खूप गरम होतात आणि ब्रेक फेल होतात. अमृतांजन पुलाजवळ टाटा नऊ नंबर येथे ट्रक टर्मिनल निर्माण करून लायनर थंड करण्याची व्यवस्था होणे गरजेचे आहे. तसेच खोपोली बायपास ते बोरघाट पायथा फुडमॉल अशा 3 किमी अंतरावर तिव्र उतार तसेच खोपोली बायपास जवळ नव्याने निर्माण झालेला बोगदा व खोपोलीसाठी जाणारी वाहतूक विरोधी बाजूला असल्याने वाहन चालकांना बुजगावणे निर्माण होत चालकांच्या मनात गोंधळ उडतो. अशी माहिती रुग्णवाहिका चालक व अपघातग्रस्तांचा मदतगार संजय म्हात्रे यांनी दिली आहे.

बोरघाटात अमृतांजन पुल ते ढेकू फुडमॉल या 15 किमी अंतरावर स्कॅनर बसविण्यात आले आहे. ज्या ठिकाणी अपघात घडला आहे. त्या अपघातग्रस्ताला तात्काळ मदत मिळण्यासाठी स्कॅनर ला टच केले असता मदत मिळण्यासाठी तहसील कार्यालय पोलीस, रुग्णवाहिका, रुग्णालय, सामाजिक कार्यकर्ते यांचे नाव व नंबर मिळून मदत मिळेल बोरघाटात 2 ठिकाणी तर तालुक्यात 75 असं 95 स्कॅनर बसविण्यात आले आहेत त्या योगे कुठे अप्रिय घटना घडल्यास माहीती मिळेल

अभय राव चव्हाण, खालापूर तहसीलदार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news