

रोहा रेल्वे स्थानकात लांब पल्ल्याच्या गाडयांना थांबा मिळावा अशी मागणी प्रवासी वर्गाची होती. प्रवासी वर्गांने व प्रवासी संघटनांनी खा. सुनील तटकरे यांची भेट घेत रोहा रेल्वे स्थानकात लांब पल्ल्याच्या जलद गाड्या थांबाव्यात अशी मागणी केली होती. या मागणीला केंद्र सरकारने सकारात्म प्रतिसाद देत रोहा येथे लांब पल्ल्याच्या जलद गाड्यांना थांबा दिला आहे.
रोहा रेल्वे स्थानकात लांब पल्ल्याच्या गाडयांना थांबा मिळावा ही मागणी सुनील तटकरे यांनी उचलून धरली. त्यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे रोह्यात जलद गाड्यांना थांबा मिळावा यासाठी पत्रव्यवहार केला व त्यांची भेट घेत रोहा रेल्वे स्थानकात जलदगाडयांना थांबा देण्याची मागणी केली. प्रवाशांच्या हिताच्या दृष्टिकोनातून खा. सुनील तटकरे यांनी केलेले प्रयत्न यशस्वी झाले असून रोह्यात लांब पल्ल्याच्या जलद गाड्यांना थांबा देण्यात आला आहे. ही मागणी पूर्ण केल्याने खा. सुनील तटकरे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत.
रोहा रेल्वे स्थानकात जलद गाड्यांना थांबा देण्यात आलेला आहे. यामध्ये प्रामुख्याने लोकमान्य टिळक (टी) मडगाव एक्सप्रेस, कोचुवेली-चंदीगड केरळा संपर्क क्रांती एक्सप्रेस, कोचुवेली-इंदूर एक्सप्रेस, हिसार-कोयंबतूर एसी एक्सप्रेस आणि दादर-तिरुनेलवेली एक्सप्रेस या महत्त्वाच्या गाड्यांना रोहा स्थानकावर व्यावसायिक थांबा मिळाला आहे. या निर्णयाचा स्थानिक नागरिकांना मोठा फायदा होणार असून, प्रवासासाठी अधिक पर्याय उपलब्ध होतील. वेळेची बचत होऊन प्रवास अधिक सोयीस्कर आणि सुलभ होईल. विशेषतः विद्यार्थी, कामगार, व्यापारी आणि प्रवास करणार्या सर्वसामान्य जनतेसाठी ही सुविधा खूप महत्त्वाची ठरेल.
यामुळे रोहा परिसरातील व्यापार-उदीमाला चालना मिळेल, शिक्षणासाठी ये-जा करणार्या विद्यार्थ्यांना अधिक सोयीस्कर प्रवास साध्य होईल आणि सामाजिक व आर्थिक विकासाला नवी गती मिळेल. हा निर्णय केवळ प्रवासाची सोय पुरवणारा नसून, तो रोहा परिसराच्या एकूणच प्रगतीचा एक महत्त्वाचा टप्पा ठरेल.
खासदार सुनील तटकरे यांनी या सकारात्मक निर्णयासाठी पाठपुरावा करून आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे प्रयत्नांना यश मिळाले आहे. मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यासाठी आणि जनतेला आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुढेही झपाट्याने काम करत राहीन, असा विश्वास त्यांच्याकडून व्यक्त होत आहे.
रोहा रेल्वे स्थानकावर गाड्यांना व्यावसायिक थांबा दिल्याबद्दल केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे पत्र प्राप्त झाले. या पत्रामध्ये रोहा रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी विविध गाड्यांचे थांबे मंजूर केल्याची माहिती दिली आहे. या निर्णयाबद्दल अश्विनी वैष्णव यांचे आभार असून स्थानिक सुविधांचा विचार करत त्वरित आणि सकारात्मक निर्णय घेतला आहे.