

अलिबाग ः आगामी येणार्या सर्व निवडणुका युती म्हणून लढणार. मात्र सध्या सुरु असलेल्या वाकयुद्धामुळे वरिष्ठ मंडळी निर्णय घेतील. महायुती म्हणून लढलो तर सर्व जागा आपल्याच असतील. पुन्हा एकदा सगळीकडे भगवा फडकेल. असे मंत्री भरत गोगावले यांनी अलिबाग येथील दिलीप भोईर ह्यांच्या पक्ष प्रवेशाच्या वेळी कार्यकर्त्याना उद्देशावून सांगितले.
क्षात्रेक्य समाज सभागृहात राजिप चे माजी सभापती दिलीप भोईर यांनी आपल्या अनेक समर्थकांसह शिंदे गटाच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश केला यावेळी रोहयो चे मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी,मानसी दळवी, जिल्ह्याध्यक्ष राजा केणी , दीपक रानवडे तालुकाध्यक्ष अनंत गोंधळी यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना मंत्री गोगावले म्हणाले माणसाचे घर मोठे नसले तरी चालेल पण मन मात्र मोठे असावे. माझ्या मनांत पाप नाही तर मी घाबरू कशाला अघोरी विद्या करून काही मिळवता आले असते तर कधीच मिळवले असते. असा टोलाही त्यांनी लगावला.
दिलीप भोईर त्यावेळी एकत्र असते तर आज महेंद्र शेठ हे मताधिक्याने 1 नंबर वर गेले असते. असेही ते म्हणाले. आमदार महेंद्र दळवी विधानसभेच्या वेळी त्यांनी अलिबाग मुरुड मतदार संघ पिजून काढला होता. माझ्या या विरुद्ध निवडणूक लढवून 33 हजार मते मिळवली. . आता राजा केणी आणि दिलीप भोईर हे दोघेही मिळून माझी जबाबदारी वाटून घेतील आपलाच झेंडा सर्वत्र फडकत असेल असा विश्वास आ. दळवींनी व्यक्त केला.
दिलीप भोईर ह्यांनी पक्ष प्रवेश केल्यानंतर आपले मनोगत मांडताना म्हणाले आम्ही दोघेही एकाच गुरुचे चेले आहोत. विधानसभेला त्यांच्या विरुद्ध लढलो तरी नियतीला ते मान्य नव्हते त्यामुळे माझा पराभव झाला आणि पुन्हा एकदा आमदार म्हणून महेंद्र दळवी निवडून आले. झाले गेले ते विसरून पुन्हा एकदिलाने काम करण्याची इच्छा असल्याने शिंदे गटाच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश केला जे काम देतील ते आनंदाने स्वीकारून ते पूर्णत्वास नेण्याचा कसोशीने प्रयत्न करणार आहे. आमदारांनीही आमच्या सारख्या कार्यकर्यांची लहान सहान कामे करावीत त्यांच्याकडे लक्ष द्यावे अशी विनंती ह्यावेळी त्यांनी केली.