

रायगड, पुढारी वृत्तसेवा: पनवेलच्या कर्नाळा किल्ल्यावर शनिवारी पर्यटनासाठी आलेल्या संदीप गोपाळ पुरोहित (वय ४४, कोपरखैरणे) यांचा मधमाशांच्या हल्ल्यात मृत्यू झाला. मधमाशांच्या दंशामुळे पळापळ सुरू असताना ते पडले आणि डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात आणखी पाच जण जखमी झाले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना तातडीने नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मोठ्या प्रमाणावर पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांच्या गोंधळामुळे मधमाशा चवताळल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.