Panvel Uran water management : पनवेल-उरणच्या पाणीपुरवठ्यासाठी स्वयंचलित यंत्रणा

उद्योगमंत्र्यांकडून घोषणा, आ.प्रशांत ठाकूर यांचा विधानसभेत आक्रमक पवित्रा
Panvel Uran water management
आ.प्रशांत ठाकूरpudhari photo
Published on
Updated on

पनवेल ः पनवेल आणि उरण शहर आणि परिसरातील पाणी पुरवठा व वितरणासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधानसभेत सिडकोच्या कारभावर तीव्र नाराजी आणि आक्रमकपणे भावना व्यक्त केल्यानंतर येत्या दोन महिन्यात पाणी वितरणासाठी ऑटोमायझेशनसाठी (स्वयंचलित यंत्रणा) निविदा जाहीर करण्याचे आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी दिले असून या निर्देशानुसार कार्यवाही न केल्यास सिडकोच्या अधिकार्‍यांवर कारवाई करण्याचे आश्वासन सभागृहात दिले.

सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबईमधील पनवेल आणि उरण तालुक्यातील पाणीसंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचना उपस्थित केली. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी लक्षवेधी सूचना मांडताना नागिरकांच्या भावना आक्रमकपणे प्रकट केल्या तसेच सिडको अधिकार्‍यांच्या कारभारावर संताप व्यक्त करत ताशेरे ओढले.

लक्षवेधी सूचनेवर लेखी उत्तरात मोघम उत्तर देण्यात आले होते त्यामुळे त्याचा उल्लेख करत आमदार प्रशांत ठाकूर यांनी सभागृहात आक्रमकपणा दाखविला. बाळगंगा पासून सर्व प्रकल्प आता अर्धवट स्थितीत आहेत किंवा कामे चालू स्थितीत आहेत. आणि यामधून होणारा पाणी पुरवठ्याचा तुडवडा होत राहतो. पाण्याची पाईपलाईन सातत्याने गळत राहते आणि दोन- दोन तीन- तीन दिवस पाणी बंद केले जाते.

खारघर, कामोठे, कळंबोली, पनवेल, उलवा नोड, करंजाडे, द्रोणागिरी या सर्व वसाहतीमध्ये तुडवडा असल्याने सिडकोच्या विरोधात प्रचंड संताप नागरिकांमध्ये आहे. येथील नागरिक मध्यमवर्गीय आहेत आणि कदाचित त्यांच्या कुटुंबातील दोन्हीही व्यक्ती उद्योगधंदा करतात किंवा नोकरीला जातात. आणि अशा वेळेला पाणीच नसेल तर आंघोळ करू शकत नाही अशी स्थिती आहे. त्यामुळे या लोकांची चिडचिड व त्यांना संताप होत असतो, त्या आपल्या व्यथा आमच्याकडे सतत मांडत असतात, दिवाळीच्या दिवशीही घरात पाणी नाही असे सांगतात. कितीही मागणी बैठका घेतल्या तरी अधिकार्‍यांवर याचा काहीही फरक पडत नसल्याची टीका ठाकूर यांनी केली.

दोन महिन्याच्या आत निविदा काढा - उदय सामंत

नामदार उदय सामंत यांनी उत्तर देताना, आमदार प्रशांत ठाकूर यांनी पाण्याच्या संदर्भात तीव्र भावना आक्रमपणे मांडल्या आहेत त्याची दखल शासन घेणार असल्याचे सांगितले. काहीही करा मॅन्युअल प्रणाली बंद करून ऑटोमायझेशनकडे जात नाही तो पर्यंत यावर योग्य पर्याय निघणार नाही असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सूचित केले आहे. सीसी, ओसी थांबवणे संयुक्तिक होणार नाही मात्र पाण्याची पातळी, पुरवठा, साठवण या संदर्भात बघितल्यानंतर 319 एमएलडी पाणीचे आपण पुरवठा करीत आहोत. 23 एमएलडीचा फरक आहे.

आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे. दोन वर्षांत काही प्रकल्प होणार आहेत मग ते होईपर्यंत पाण्यासाठी थांबायचे का हे त्यांचे म्हणणे सकारात्मक आणि बरोबर आहे. जोपर्यंत पाणी वितरणाचे ऑटोमायझेशन होत नाही तो पर्यंत त्याला पर्याय निघणार नाही, त्यामुळे दोन महिन्याच्या आत या संदर्भातील निविदा जाहीर करण्याचे निर्देश सिडकोला आजच दिले जातील, असे आश्वासन नामदार उदय सामंत यांनी देणार असल्याचे आश्वासित केले. त्याचबरोबरीने यामध्ये अधिकार्‍यांनी दुर्लक्ष केले तर त्यांच्यावर कारवाईचा बडगा उचलणार असल्याचेही त्यांनी यावेळी आपल्या निर्देशात स्पष्ट केले.

पाणी विषयाच्या बाबतीत सिडकोचे पूर्ण आनंदीआनंदी आहे. टाटा कन्सल्ट एजन्सी नेमली गेली या एजन्सीने काम केले की त्यांनी पैसे खाल्ले का असा सवाल करत एअर इंडियाचे झाले तसे येथेही टाटा कन्सल्टची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. गेली सहा महिन्यापासून हे टेंडर निघत नाही. मी तर गेल्या वर्षभरापासून मागणी करत होतो. टाटा कन्सल्टन्ट एजन्सीचा अहवाल सिडकोकडे येऊन दीड वर्ष झाला आहे मग पुढील कार्यवाही का करत नाही यासाठी सिडकोकडे पैशाची कमतरता आहे का.

आ. प्रशांत ठाकूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news