

उरण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूचे जानेवारीमध्ये उद्घाटन झाल्यापासून वाहतुकीत सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. या वाढलेल्या वाहतूकीत जास्त प्रमाण हे जड वाहनांचे आहे.
जड वाहने म्हणजे ट्रक आणि बस ते या सेतूचा वापर करतात. जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान 700 टक्के पेक्षा जास्त वाढली आहे, परंतु त्या मानाने खाजगी छोट्या गाड्यांमध्ये एवढी वाढ झालेली दिसत नाही. ही वाढ केवळ 31 टक्के आहे असे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माहितीच्या अधिकारात उघड झाली आहे.
दक्षिण मुंबईचे रहिवासी जितेंद्र घाडगे यांनी हा (आरटीआय) अर्ज दाखल केला होता. भारतातील सर्वात लांब सागरी सेतू वापरणार्या वाहनांची एकूण संख्या जानेवारीमध्ये 5.20 लाखांवरून ऑगस्टमध्ये 7.25 लाखांवर गेली. वाहतुकीत घट केवळ एप्रिल आणि जुलै महिन्यातच दिसून आली. एप्रिल महिन्यात 43 हजार 932 आणि जुलै महिन्यात 18 हजार 797 ने कमी झाली होती. पुलावरील एकूण वाहतूक मात्र, एमएमआरडीएच्या दरमहा 11.79 लाख वाहने किंवा दररोज 39 हजार 300 वाहने येण्याच्या अंदाजापेक्षा लक्षणीयरीत्या कमी आहे. हा पूल 70 हजारच्या दैनंदिन वाहनांच्या क्षमतेसाठी तयार करण्यात आला आहे.
आकडेवारीनुसार ट्रक आणि बस यांसारख्या अवजड वाहनांच्या वाहतुकीत लक्षणीय वाढ दर्शवते. पण ते फक्त 7 टक्के रहदारीचे आहेत. अंदाजे 93 टक्के प्रवासी गाड्या आहेत, असे घाडगे यांनी सांगितले. जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीत या पुलाचा वापर करणार्या गाड्यांची संख्या केवळ 31 टक्क्यांनी वाढली आहे. टोलचे वाढलेले दर आणि मुंबई-पुणे सारख्या प्रमुख रस्त्यांशी अपुरी कनेक्टिव्हिटी यामुळे अनेक खासगी गाड्या पुलाचा वापर टाळत आहेत. द्रुतगती मार्ग नवी मुंबई ते दक्षिण मुंबईपर्यंतच्या मध्यमवर्गीय प्रवाशांना प्रति कार 250 टोल परवडत नाही, त्यामुळे त्यांना पर्यायी मार्ग शोधतात. हा पूल केवळ श्रीमंत वाहनचालकांना फायदेशीर असल्याचे घाडगे यांनी सांगितले.
जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीत या पुलाचा वापर करणार्या गाड्यांची संख्या केवळ 31 टक्क्यांनी वाढली आहे. टोलचे वाढलेले दर आणि मुंबई-पुणे सारख्या प्रमुख रस्त्यांशी अपुरी कनेक्टिव्हिटी यामुळे अनेक खासगी गाड्या पुलाचा वापर टाळत आहेत.