शेकापने अलिबागमध्ये कार्यकर्ता मेळावा आयोजित करत जोरदार शक्ती प्रदर्शन केले. यात शेतकरी कामगारपक्षाकडून पेण-सुधागड-रोहा मतदारसंघातून शेकापचे खजिनदार तथा आर्किटेक्ट अतुल नंदकुमार म्हात्रे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अलिबागमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून राजकीय पक्षांकडून उमेदवार याद्या जाहीर केल्या जात आहेत. महाविकास आघाडीमध्ये अद्याप जागावाटपाची चर्चा सुरु असतानाच घटक पक्ष असलेल्या शेतकरी कामगार पक्षाने त्यांचे उमेदवार जाहीर केले आहेत. एकीकडे महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नसताना शेकापनं चार उमेदवार जाहीर करत आघाडी घेतली आहे. जयंत पाटील यांनी विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. शेतकरी कामगार पक्ष हा महाविकास आघाडीत आहे.
जयंत पाटील यांनी शेकापचे खजिनदार तथा आर्किटेक्ट अतुल म्हात्रे हे पेण सुधागड रोहा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं.
भाजप पक्षाकडून पेण विधानसभा मतदार संघात गेले आठवडाभर उमेदवार कोण असेल हे नीच्शित करण्यात आले नव्हते. मात्र उमेदवार निवडायचे अधिकार विद्यमान आमदार रवि पाटिल यांचेकडेच असतानाही त्यांनी कधी स्वतःचे, कधी मुलाचे वैखुंट पाटिल तर कधी सूनबाई प्रीतम पाटिल याचें नाव पुढे करत आसल्याने हा पेच निर्माण झाला होता. शेवटी विद्यमान आमदार रवि पाटिल यांचेच नाव अंतीम करून पुढील यादीत नाव जाहिर करण्याचे ठरलं आहे.
अजित पवार गटाचे आमदार अनिकेत तटकरे यांनीही भाजप च्या तिकिटावर पेण मधुन लढण्यास इच्छुक असल्याचे जाहीर केले. त्यामुळे भाजप कडून नक्की कोण असा संभ्रम कायम ठेवला.
शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून नक्की पेण साठी कोण हे अजुनही अनीच्षित असले तरीहीप्रसाद भोईर यां नविन उमेदवाराने शिवसेना ठाकरे गटाकडे जाऊन उद्धव ठाकरे यांना भेटून आपण पेण साठी इच्छुक असल्याचे जाहिर केले. मात्र त्यांच्या पक्ष प्रवेशाचा ही निर्णय ही अजून झालेला नाही. मात्र यापूर्वी सेनेचे सम्पर्क प्रमुख विष्णू पाटील यांनीही पेण मधुन आपण इच्छुक असल्याचे जाहिर केले होते.
तर इंडिया आघाडीत शेकाप व शिवसेना ही आसल्याने नक्की शेकाप चां उमेदवारी अतूल म्हात्रे, की शिवसेना कडून उमेदवारी आसेल हे अजुनही जाहिर झालेले नाही.