महाड अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत : भरत गोगावले

'शासकिय रुग्णालयात अमुलाग्र बदल करण्यासाठी प्रयत्न'
Announcement of Rs 5 lakh assistance to the relatives of those killed in Mahad accident
महाड अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रूपये मदतीची घोषणा File Photo
Published on
Updated on

महाड : श्रीकृष्ण द. बाळ 

दोन जानेवारीच्या मध्यरात्री मुंबई-गोवा महामार्गावरील वीर रेल्वे स्टेशन समोर महाड मधील युवकांचा अपघात झाला होता. यामध्ये मृत्यूमुखी पडलेल्‍या संबंधितांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी पाच लक्ष रुपये देण्याची घोषणा भरत शेठ गोगावले यांनी केली होती. काल (शनिवार) महाडमध्ये आल्यावर त्यांनी या दुर्घटनाग्रस्त युवकांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. महाड शासकीय रुग्णालयात आगामी काळात अमुलाग्र बदल करण्याचे प्रयत्न केले जातील अशी ग्वाही त्यांनी याप्रसंगी दिली.

मुंबई-गोवा महामार्गावरील वीर गावच्या हद्दीत झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यु झाला होता.  या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपये मदत दिली जाणार असल्याची माहिती मंत्री भरत गोगावले यांनी दिली आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे याबाबत आपण मागणी केली आहे. त्याला तातडीने मंजुर दिली असल्याचे गोगावले म्हणाले. या अपघातानंतर ग्रामिण भागातील रुग्णालयांमधुन मिळणाऱ्या उपचाराबाबत संताप व्यक्त होत असून, शासकिय रुग्णालयांमधुन मिळणाऱ्या उपचारांमध्ये अमुलाग्रह बदल घडवुन अडीअडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे गोगावले यांनी स्पष्ट केले आहे. महाड मधील कुंभार आळीतील दोन युवकांचा यामध्ये मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटुंबीयांना आपल्या सहकाऱ्यांसमवेत शनिवारी रात्री उशिरा निवासस्थानी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news