Amba river biomedical waste pollution
जैववैद्यकीय कचऱ्याच्या विळख्यात अंबा नदी pudhari photo

Amba river biomedical waste pollution : जैववैद्यकीय कचऱ्याच्या विळख्यात अंबा नदी

पाली नगरपंचायत प्रशासन खडबडून जागे , तालुक्यातील खासगी क्लिनिकची होणार तपासणी
Published on

पाली ः संपूर्ण रायगड जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेल्या अंबा नदीच्या काठावर थेट जैववैद्यकीय घातक कचरा टाकल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. वापरलेल्या सलाईनच्या बाटल्या, इंजेक्शनच्या सुई, नळ्या, औषधांच्या काचा असा अत्यंत धोकादायक कचरा मोठ्या प्रमाणात नदीलगत टाकण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

या ठिकाणी टाकलेला कचरा पाहता तो रुग्णालय, खासगी दवाखाना किंवा वैद्यकीय कचरा संकलन करणाऱ्या एजन्सीकडूनच टाकण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे. हा कचरा उघड्यावर असल्याने मानवी आरोग्याला तसेच जनावरांना गंभीर धोका निर्माण झाला असून अंबा नदीच्या पाण्याचे प्रदूषण अटळ ठरणार आहे.

Amba river biomedical waste pollution
Marine Drive Sea Rescue : समुद्रात उतरलेल्या महिलेचा जीव वाचविण्यात यश

अंबा नदीच्या काठावर आढळून आलेल्या जैववैद्यकीय घातक कचऱ्याच्या पार्श्वभूमीवर पाली नगरपंचायत व पाली मेडिकल असोसिएशन यांची तातडीची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला नगराध्यक्ष पराग मेहता, उपनगराध्यक्ष सुलतान बेनसेकर, नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी माधुरी मडके, तसेच पाली मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. जयंत जाधव व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.

यावेळी पाली मेडिकल असोसिएशनच्या वतीने खुलासा करताना सांगण्यात आले की, आम्ही यापूर्वी कडे नोंदणी केली होती; मात्र संबंधित एजन्सीकडून वेळेवर वाहन पाठविण्यात आले नाही. त्यामुळे कचरा व्यवस्थापनात अडचणी निर्माण झाल्याची चर्चा बैठकीत झाली.

Amba river biomedical waste pollution
Safale bus depot problems : सफाळे एसटी आगाराला लागली उतरती कळा

नगरपंचायत, तालुका वैद्यकीय अधिकारी, प्रदूषण नियंत्रणअंबा नदी प्रदूषणाच्या गंभीर घटनेनंतर जबाबदाऱ्या स्पष्ट करण्यासाठी व पुढील गैरप्रकार टाळण्यासाठी ही बैठक महत्त्वाची ठरली असून, यापुढे जैववैद्यकीय कचऱ्याची शास्त्रशुद्ध विल्हेवाट लावली जाईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. मंडळ आणि मेडिकल असोसिएशन आता एकमेकांकडे बोट न दाखवता जबाबदारी स्वीकारणार का? असा प्रश्न पालीकर विचारत आहेत. येत्या काही दिवसांत होणारी क्लिनिक तपासणी ही केवळ औपचारिक ठरणार की खरोखर कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दोन दिवसांत क्लिनिकची तपासणी

येत्या दोन दिवसांत नगरपंचायतीचा कर्मचारी पालीतील सर्व खाजगी डॉक्टरांच्या क्लिनिकला प्रत्यक्ष भेट देणार असून,महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडील नोंदणीची छायांकित प्रत, डॉक्टरांची शैक्षणिक अर्हता व अधिकृत कागदपत्रे नगरपंचायतीकडे जमा केली जाणार असल्याचे उपनगराध्यक्ष सुलतान बेनसेकर यांनी जाहीर केले.

जैववैद्यकीय घातक कचरा उचलण्याची जबाबदारी नगरपंचायतीची नाही. कचरा व्यवस्थापन नियमांनुसार खाजगी डॉक्टर, क्लिनिक व रुग्णालयांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे ोंदणी करणे बंधनकारक आहे. नोंदणीनंतर अधिकृत एजन्सीकडूनच हा कचरा उचलला व शास्त्रशुद्ध पद्धतीने विल्हेवाट लावली जाते.

माधुरी मडके, मुख्याधिकारी

याबाबत आपण महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाशी चर्चा केली असून, डॉक्टरांनी पुन्हा नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी. तसेच नागोठणे, रोहा व परिसरातील इतर भागात कोणत्या एजन्सी कार्यरत आहेत, याची माहिती घेऊन मेडिकल असोसिएशनची स्वतंत्र बैठक घेऊन योग्य निर्णय घ्यावा.

पराग मेहता, नगराध्यक्ष

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news