

खोपोली | थंडीच्या वाढत्या प्रमाणामुळे आंब्यांना मोहोर येण्याची प्रक्रिया सातत्याने सुरू असून, अनेक ठीकाणी गावरान आंब्यांना मोठ्या प्रमाणात मोहर आलेला पहावयास मिळत आहे.
यामुळे या वर्षी मोठ्या प्रमाणात आंबे खावयास मिळणार आहेत. मोहोर मोहर आल्याने फळ धारणेतील फळांची गळती होत असल्याची स्थिती पहावयास मिळत आहे. फळांची गळती थांबावी आणि मोहोरचे संरक्षण व्हावे, यासाठी औषधांची फवारणीची लगबग शेतकरी वर्गात सुरू आहे. मोहोर चांगल्या प्रमाणात असल्याने शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत.
मोहोरामध्ये फलधारणा झाली असून, काही ठिकाणी हिरव्या वाटाण्याएवढी, तर काही ठिकाणी आवळा व सुपारी एवढ्या आकाराची कैरी झाली आहे. सध्या आंबा फळे आकाराने लहान असली तरी काही दिवसात च कैरी बाजारात दाखल होण्याची शक्यता शेतकरी वर्ग व्यक्त करीत आहे.
हवामान बदलामुळे ह्या मोहर आ-लेला गळून जाण्याची शक्यता शेतकरी वर्गाकडून वर्तवली जाता आहे. मात्र आंब्यांची फळगळती रोखण्यासाठी शेतक-यांनी कंबर कसली आहे. कारण आताच आपण फळगळती रोखली तर भविष्यात आपल्याला आंबे खावयास मिळणार आहे. यांच विचारांतून शेतक-यांची लगबग झाली सुरु झाली आहे. आंब्याना आलेला मोहर पाहून या वर्षी चांगलेच आंबे खावयास मिळणार अशी भावना व्यक्त करीत आहे.