Alibaug Murder Case : धक्कादायक! नातवाने आजीचा खून करून मृतदेह १०० फूट खोल दरीत फेकला

अलिबागमधील आंबेनळी घाट परिसरातील घटना
Alibaug Murder Case
Alibaug Murder Case
Published on
Updated on

पोलादपूर : आंबेनळी घाट परिसर पुन्हा एकदा एका गंभीर गुन्हेगारी घटनेमुळे हादरला आहे. अलिबाग येथील एका नराधम युवकाने स्वतःच्या सख्ख्या आजीचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह आंबेनळी घाटातील खोल दरीत फेकून दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी अलिबाग पोलिसांनी संशयित आरोपी नातवाला ताब्यात घेतले असून, प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम आणि महाबळेश्वर ट्रेकर्सने गुरुवारी (दि.४) भर पावसात धाडसी मोहीम राबवून १०० फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित युवकाने दोन दिवसांपूर्वी आपल्या आजीची हत्या केली होती. गुन्ह्याचा सुगावा लागू नये, म्हणून त्याने मृतदेह महाबळेश्वर-पोलादपूर दरम्यानच्या आंबेनळी घाटातील बावली टोक ते दाभिल टोक दरम्यान खोल दरीत फेकून दिला. अलिबाग पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत संशयित युवकाला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच मृतदेह नेमका कुठे फेकला, ते ठिकाणही पोलिसांना दाखवले.

घाटातील अत्यंत दुर्गम आणि खोल दरीमुळे मृतदेह बाहेर काढणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. अखेर स्थानिक रेस्क्यू टीमच्या मदतीने गुरुवारी दुपारी हे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. या घटनेमुळे संपूर्ण रायगड आणि सातारा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वीच याच घाटात भीषण अपघात होऊन आठ युवकांचा मृत्यू झाला होता, ती घटना ताजी असतानाच आता या क्रूर हत्याकांडाने परिसर सुन्न झाला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास अलिबाग पोलीस करत आहेत.

भर पावसात महाबळेश्वर ट्रेकर्स आणि प्रतापगड टीमची मोहीम

पोलादपूर पोलीस ठाण्यातून गुरूवारी (दि.४) सकाळी ८.३० च्या सुमारास प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमचे सदस्य अजित जाधव यांना आंबेनळी घाटात मृतदेह दरीत टाकल्याचा निरोप मिळाला. माहिती मिळताच महाबळेश्वर ट्रेकर्स व प्रतापगड रेस्क्यू टीमचे जवान आवश्यक साहित्यासह तातडीने घाटाकडे रवाना झाले.

मृतदेह नेमका कुठे टाकला आहे, याची निश्चित माहिती नसतानाही टीमने घाटात शोधमोहीम सुरू केली. सुमारे दीड तासांच्या शोधकौशल्यानंत १०० फूट खोल दरीमध्ये एका काळ्या रंगाच्या पिशवीत मृतदेह आढळून आला. रेस्क्यू टीमने तात्काळ रोप आणि इतर यंत्रणेचा सेटअप लावून खोल दरीत धाडसी प्रवेश केला. निसरडी दरी आणि सुरू असलेल्या मुसळधार पावसाची तमा न बाळगता, तासाभराच्या अथक परिश्रमानंतर मृतदेह यशस्वीरित्या वर काढण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news