

अलिबाग : अलिबाग नगरपरिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) शिरकाव करत राजकीय समीकरणे बदलून टाकली आहेत. भाजपचे उमेदवार ॲड. अंकित बंगेरा यांनी शेकाप–काँग्रेस आघाडीचे उमेदवार अभय म्हामुणकर यांचा पराभव करत भाजपाचा अलिबाग नगरपरिषदेत प्रवेश निश्चित केला. या निकालामुळे शेकापला मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान, शिवसेना (ठाकरे गट) यांनीही दोन जागांवर विजय मिळवत आपले अस्तित्व कायम राखले आहे. ठाकरे गटाचे उमेदवार संदीप पालकर आणि श्वेता पालकर यांनी शेकापचे उमेदवार महेश शिंदे आणि रेश्मा घरत यांचा पराभव केला. या विजयामुळे ठाकरे गटाने शेकापच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावल्याचे चित्र दिसून येत आहे.
मात्र, नगराध्यक्ष पदाच्या लढतीत शेकापने बाजी मारली आहे. शेकापच्या अक्षया नाईक यांनी भाजपच्या उमेदवार तनुजा पेरेकर यांचा पराभव करत नगराध्यक्ष पदी विजयी झाल्या आहेत.