

रायगड जिल्ह्यातील अलिबाग शहरातील शिवलकर नाका येथे हजारो रुपये किंमतीचा गुटखा, देशी विदेशी मद्य सहित भांगेच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या असून जयप्रकाश संपत पटेल (42 वर्ष,रा.रामवाडी, ता.पेण,मुळ-मध्यप्रदेश) आणि यश रुपेश नागवेकर(रा.शिवलकर नाका, अलिबाग) या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
अलिबाग शहरातील शिवलकर नाका येथे शनिवारी पहाटे अलिबाग शहरात नाकाबंदी करीत असताना जयप्रकाश संपत पटेल हा संशयित रात्री सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास अलिबाग बस स्थानककडे पायी चालत येत असता त्याला आवाज देवून थांबविले.त्याच्याकडे असलेल्या असलेली काळ्या रंगाची बँग तपासली असता विमल गुटख्याचे दोन पॉकेट मिळाले .
या बाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची देत असताना त्याला पोलिसी खाक्या दाखवला असता जयप्रकाश याने सांगितले की, जयप्रकाश हा गुटखा विक्रेता असून तो मुंबई येथून एसटी बसने विमल गुटखा, राजश्री गुटखा सहित इतर प्रकारचा गुटखा घेऊन अलिबाग येथे आला असून त्याने शिवलकर नाक्यावरील दिशीता पान शॉप येथे दिला असल्याबाबत माहिती दिली.
त्यानंतर तपास पथकातील अधिकारी पोलिस उप निरीक्षक दीपक मोरे, पोलिस उप निरीक्षक बळीराम केंद्रे, पोलिस हवालदार म्हात्रे,पाटील, महिला पोलिस हवालदार घरत,पोलिस शिपाई नांदगावकर,जाधव आदींनी जयप्रकाश संपत पटेल याला सोबत घेऊन शिवलकर नाक्यावरील यश नागवेकर याचे घरी गेले. त्यावेळी यश नागवेकर हा त्याचे घरात बसलेला होता, त्याच्या घरात अधिक शोध घेतला असता असता,महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले विमल गुटखा, इतर प्रकारचा गुटखा व देशी विदेशी दारू, बियर आदी अडूष्ट हजार एकोण पन्नास रुपये पन्नास पैसे किमतीचा मुद्देमाल मिळून आला आहे. तसेच जयप्रकाश संपत पटेल याच्या कडे असलेल्या बॅगमध्ये दहा हजार नऊशे चाळीस रुपये किंमतीचा मुद्देमाल आढळून आला आहे.
याबाबत अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून अधिक तपास पोलिस निरीक्षक किशोर साळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सहायक पोलीस निरीक्षक मुसळे करीत आहेत.या तपासत अन्यही बेकायदा साठे मिळण्याची शक्यता असल्याने पोलीस कसून तपास करित आहेत.