Gas cylinder shortage Alibag : अलिबागमध्ये इडलीवरील सांबार झाले गायब

सिलिंडरअभावी छोट्या व्यावसायिकांचा निर्णय
Gas cylinder shortage Alibag
अलिबागमध्ये इडलीवरील सांबार झाले गायबpudhari photo
Published on
Updated on

अलिबाग ः अतुल गुळवणी

सकाळी नाष्टा म्हणून गरमागरम इडली सांबार खाण्याची मजा काहीऔरच.गरमागरम सांबाराचे भुरके मारत सोबत हिरवीगार चटणी म्हणजे ब्रह्मानंदी टाळीच.पण गेल्या काही दिवसात अलिबागमध्ये छोट्या व्यावसायिकांनी सिलिंडर उपलब्ध नसल्याचे सांगत चक्क इडलीवर देण्यात येणारे सांबार बंद करुन केवळ चटणी देण्यास सुरुवात केल्याने नियमितपणे इडली खाणाऱ्यांचा हिरमोड झाला आहे.जोपर्यंत सिलिंडरचा पुरवठा नीटपणे होत नाही तोपर्यंत इडलीवरील सांबार उपलब्ध होणार नाही असेही व्यावसायिकांनी सुचित केलेले आहे.

गरमागरम इडली सांबार हा खरतरं दाक्षिणात्य पदार्थ.पण आता तो मराठी माणसाला आपलासा वाटू लागलाय. सुटीच्या दिवशी घरोघरी इडली सांबाराचा बेत हा पक्का असतो.अनेक महिला तर दिवसभर इडली,सांबारच हा मेन्यू ठेवतात. अलिबागमधील बहुतांशी सर्वच हॉटेलमध्ये सकाळच्या सत्रात इडली,सांबार हा मेन्यू असतोच.

Gas cylinder shortage Alibag
Gas Cylinder Shortage: गॅसटंचाईमुळे पिंपरी-चिंचवडमध्ये चुली पेटल्या; उद्योग, हॉटेल, मेस अडचणीत

मोठ्या हॉटेल्समध्येएका इडली प्लेटची किंमत 70 ते 80 रुपयांपर्यंत आहेत.तर छोट्या व्यावसायिकांकडे याच इडलीची किंमत 15 रुपयांना तीन इडली,सांबार असे दिले जाते.अलिबाग एसटी स्टॅन्ड परिसरात असे छोटे व्यावसायिक सकाळच्या सत्रात इडलीसह पोहे,उपमा,खिचडी,घावण आदी पदार्थ मोठ्या प्रमाणात विकले जातात.या सर्व पदार्थांची किंमत सरासरी 10 ते 15 रुपये अशीआहे.

गरमागरमघावणेसोबत बटाटा भाजी आणि चटणीही मिळते.सध्या काही व्यावसायिकांनी इडलीसोबत चटणी देण्यावरच भर दिल्याचे जाणवते.याशिवाय अलिबागमध्ये मशिनवर तयार होणाऱ्याइडलीलाही खवय्यांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे.इलेक्ट्रिक मशिनमधून तयार होणाऱ्या गरमागरम खाण्याची मजा काही औरच असते.तांदळाशिवाय नाचणीच्या इडलींनाही मागणी वाढत चालली आहे.मधुमेही ग्राहक नाचणीच्या इडलीला पसंती दर्शवित आहेत.

या इडलींसोबत गरमागरम सांबार दिले जाते.सोबत चटणीही असते.पण युद्धजन्य परिस्थितीमुळे या व्यावसायिकांनी इडलीसोबतचे सांबार देणे बंद करुन टाकले आहे.यामुळे आता केवळ इडली,चटणीचा आस्वादघ्यावा लागत आहे.या इडलीचा दर गेल्या पंधरा दिवसांपूर्वी 10 रुपयाला एक पिस असा होता.पण तीच एक इडली आता 15 रुपये अशी झालेली आहे. युद्धजन्य परिस्थितीने दरवाढ झाल्याचे कारण देण्यात आलेले आहे.

Gas cylinder shortage Alibag
LPG Gas Crisis | नृसिंहवाडीत हॉटेल, मिठाई उत्पादन बंद; धार्मिक कार्यक्रमांमधील जेवणावळींवर मर्यादा

युद्धजन्य परिस्थितीने आम्हाला आता व्यावसायिक सिलिंडर उपलब्ध होत नाहीत.यामुळे आम्ही आता इडलीसोबत गरमागरम सांबार देणे बंद केलेले आहे.चटणी ही घरीच बनविली जाते.पण त्यासाठीगॅसचा वापर करावा लागत नाही.यामुळे ग्राहकांना आम्ही नाईलाजास्तव इडलीसोबत चटणी देत आहोत.

योगेश गांधी, नादब्रह्म इडली सेंटर,अलिबाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news