Bribery case: एसीबीचा सापळा ! 3 लाखांची लाच घेताना पोलीस हवालदारास रंगेहात पकडले

Maharashtra bribery news: संबंधित हवालदाराने पॉक्सो कायद्यांतर्गत कारवाई न करण्यासाठी आणि मदत करण्याच्या मोबदल्यात एकूण पाच लाख रुपयांची लाच मागितली होती
GST officers bribery
GST officers bribery: दोन जीएसटी अधिकार्‍यांवर लाच मागितल्या प्रकरणी गुन्हाPudhari
Published on
Updated on

महाड: रायगड स्थानिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी (दि.10) महाड येथे सापळा रचून एका तीन लाख रुपयांची लाच स्वीकारताना पोलिस हवालदारास रंगेहात पकडले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

अलिबाग पोलिस मुख्यालयात कार्यरत असलेले हवालदार विशाल वाघाटे (क्रमांक 961) यांनी एका तक्रारदाराकडून पॉक्सो कायद्यांतर्गत कारवाई न करण्यासाठी आणि मदत करण्याच्या मोबदल्यात एकूण पाच लाख रुपयांची लाच मागितली होती. या मागणीतील पहिला हप्ता म्हणून तीन लाख रुपये स्वीकारताना एसीबीच्या रायगड युनिटने वाघाटे यांना जेरबंद केले.

याप्रकरणी महाड शहर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 (सुधारित 2018) अंतर्गत कलम 7 नुसार गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई रायगड स्थानिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपअधीक्षक श्रीमती सरिता भोसले यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. पथकात पोलीस निरीक्षक निशांत धनवडे, नारायण सरोदे, सहायक फौजदार विनोद जाधव, अरुण करकरे, श्रीमती सुषमा राऊळ, पोलीस हवालदार महेश पाटील, परम ठाकूर, सुमित पाटील, सचिन आटपाडकर, महिला पोलीस शिपाई मोनाली पाटील आणि अनंत घरत यांचा सहभाग होता. या संपूर्ण कारवाईस अँटी करप्शन ब्युरो, ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील तसेच अपर पोलीस अधीक्षक भागवत, सोनवणे व सुहास शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.

रायगडातमधील कारवाईमुळे भ्रष्टाचार विरोधी मोहिमेस अधिक गती प्राप्त झाली आहे. अशा प्रकारच्या घटनांना आळा बसविण्यासाठी नागरिकांनी व तक्रारदारांनी स्वतःहून पुढाकार घेऊन कोणतीही भीती न बाळगता तक्रार दाखल करावी; असे आवाहन लाचलुचपत विभागामार्फत करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news