मुंबई गोवा महामार्गावर मद्यपी ट्रक चालकाची पोलीस वाहनास जोरदार धडक

सहाय्यक पोलीस निरीक्षकासह चालक जखमी, मुंबई-गोवा मार्गावरील सुकेळी येथील घटना
Mahamarg accident
ट्रक चालकाची पोलीस वाहनास जोरदार धडक pudhari photo
Published on
Updated on

नागोठणे : येथील पोलीस ठाणेच्या हद्दीतील मुंबई गोवा महामार्गावरील सुकेळी हद्दीत जिंदाल कंपनी जवळ मंगळवार, 3 सप्टेंबर रोजी पहाटे मद्यपी ट्रक चालकाने नागोठणे पोलिस बोलेरो जीपला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात सहा.पोलिस निरीक्षकांसह जीप चालक जखमी झाले.

नागोठणे सहा.पोलिस निरीक्षक सचिन कुलकर्णी हे चालक मिलिंद महाडीक यांच्यासह बोलेरो पोलिस जीप या शासकीय वाहनाने विभागीय गस्ती करीता कोलाड पोलीस ठाणे येथे भेट देवुन मंगळवार 3 सप्टेंबर रोजी पहाटे 2.40 वा.चे सुमारास नागोठणे येथे परत येत असताना वाटेत मुंबई - गोवा महामार्गावरील सुकेळी गावचे हद्दीत जिंदाल कंपनी समोर रस्त्याचे खाली एक ट्रक हा पलटी झालेला होता. त्या ठिकाणी कुलकर्णी यांनी आपली शासकीय जिप उभी करून मदतीकरीता रस्त्याच्या बाजूला थांबले असता; त्याच दरम्यान दारूच्या नशेत तर्ररर्र् असलेला ट्रक चालक सुभाष त्रिजुगी यादव, रा. शिवाजी नगर, मानखुर्द मुंबई (सध्या रा. पद्मावती नगर वरसगाव कोलाड, ता. रोहा) याने त्याच्या ताब्यातील ट्रक हा नागोठणे बाजूकडून कोलाड बाजुकडे हयगयीने चालवून उभी असलेली शासकीय पोलीस जिपला समोरुन ड्रायव्हर बाजुला जोरदार धडक दिली.

यात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले असून याची नोंद नागोठणे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पीएसआय संजय चव्हाण हे करीत आहेत.

Mahamarg accident
Electricity News | वीज अपघात रोखण्यासाठी आता स्पेसर बसविणार

जखमींवर उपचार सुरू

या अपघातात सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी व चालक पोलिस शिपाई मिलिंद महाडीक यांना लहान मोठ्या स्वरुपाच्या दुखापती होऊन दोघेही जखमी झाले. त्यांच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथोमोपचार करून पुढील उपचारासाठी पेण येथे रवाना करण्यात आले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news