नवी मुंबई येथून गोरगरीब मुलींना देहविक्री व्यवसायात ओढणारा दलाल जेरबंद

Prostitution Business | संशयित मोतीन व शायना यांचा शोध सुरु
A broker who lured poor girls into prostitution business from Navi Mumbai arrested
नवी मुंबई येथून गोरगरीब मुलींना देहविक्री व्यवसायात ओढणारा दलाल जेरबंद
Published on
Updated on

पनवेल ः गोरगरीब मुलींचा, महिलांचा देहविक्री व्यवसायासाठी उपयोग करणारा दलाल नवी मुंबई अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाकडून जेरबंद करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांच्या पथकाकडून सदर धडाकेबाज कामगिरी करण्यात आली आहे.

आरोपी वैजद अली खान उर्फ राजू मंडल, वय - 29 असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर संशयित मोतीन व शायना यांचा पोलीस शोध घेत आहेत. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाकडून वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांच्या नेत्तृत्वाखाली पनवेलमधील करंजाडे परिसरात सापळा कारवाईत या दलाला अटक करण्यात आली. यासंबंधित आणखी दोघांचा शोध पोलीस घेत आहेत.

सापळा कारवाईत तीन महिला व एक बांगलादेशी महिला यांची सुटका करण्यात आली. आरोपी वैजद अली खान उर्फ राजू मंडल हा कुख्यात दलाल असून तो मोतीनच्या साथीने गरीब महिलांना पैशाचे आमिष देऊन त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेत होता.

तसेच कारवाईत आढळून आलेल्या अल्पवयीन बांगलादेशी मुलीचा पुरवठा शायना या महिला दलालाने केला असल्याची माहिती उघडकीस आली आहे. याबाबत पनवेल शहर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात पिटा अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news