Fishing Boat Surveillance Drones- परराज्यातील मच्छीमार बोटींवर नजर ठेवण्यासाठी ९ ड्रोन तैनात

कोस्ट गार्डचीही मदत, मत्स्यव्यवसाय उपाआयुक्तांचा दावा; घुसखोरी रोखणे गरजेचे
ड्रोन
परिसरात राहणार ड्रोनची नजरPudhari File Photo
Published on
Updated on

कोप्रोली : पंकज ठाकूर

उरण एक ऑगस्टपासून राज्याच्या जलाधिक्षेत्राच्या १२ नॉटिकल सागरी मैलाच्या बाहेर फक्त अॅक्सेस पासधारक मच्छीमार बोटींनाच मासेमारीसाठी परवानगी दिली आहे. मात्र या दरम्यान पररा-ज्यातील मच्छीमार बोटींची महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत प्रवेश करणाऱ्या घुसखोरांवर करडी नजर ठेवण्यासाठी ड्रोन आणि कोस्ट गार्डची मदत घेतली जात असल्याची माहिती मत्स्य विभागाचे उपायुक्त नवनाथ भदुले यांनी दिली. यावर्षी पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी १५ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आला आहे.

मत्स्य उत्पादन वाढीसाठी हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी एक ऑगस्ट-पासूनच राज्याच्या जलाधिक्षेत्राच्या १२ नॉटिकल सागरी मैलाच्या बाहेर अॅक्सेस पासधारक मच्छीमार बोटींना मासेमारीला परवानगी देण्याची घोषणा केली आहे. मत्स्यवसाय मंत्र्यांनी घेतलेल्या या दुटप्पी भूमिकेमुळे मात्र मच्छीमार संतप्त झाले आहेत. संतप्त झालेल्या महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष लिओ कोलासो, कार्याध्यक्ष रामकृष्ण तांडेल, सरचिटणीस किरण कोळी यांनी तर पारंपारिक मच्छिमारांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला असल्याचा आरोप करीत या प्रकरणी मुख्य-मंत्र्यांनीच हस्तक्षेप करून मंत्री नितेश राणे यांना मंत्रिमं-डळातून बडतर्फ करावे अशी थेट मागणी करून खळबळ उडवून दिली होती.

ड्रोन
Raigad Dam Water Storage-रायगड जिल्ह्यातील २४ धरणे ओव्हरफ्लो

दरम्यान एक ऑगस्टपासून राज्याच्या जलाधिक्षेत्राच्या १२ नॉटिकल सागरी मैलाच्या बाहेर अॅक्सेस पासधारक मच्छीमार बोटींना मासेमारीला परवानगी दिल्याने गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू आदी परराज्यातील मच्छीमार बोटी महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत घुसखोरी करून मासेमारी करण्याची भीती मच्छीमारांकडून व्यक्त केली जात आहे. तसेच महाराष्ट्राच्या हद्दीत परराज्यातील मच्छीमारांच्या संभाव्य घुसखोरीमुळे मत्स्य उत्पादन वाढीच्या प्रयत्नांनाच अडथळा निर्माण होण्याची शक्यताही मच्छीमारांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे कोणतीही साधने उपलब्ध नसताना मत्स्यव्यवसाय विभाग महाराष्ट्रातील जलाधिक्षेत्रात होणारी घुसखोरी रोखणार कशी अशी विचारणाही मच्छीमार व मच्छीमार संस्थांकडून केली जात आहे.

मात्र महाराष्ट्रातील जलाधिक्षेत्रात पररा-ज्यातील मच्छीमारांची घुसखोरी होणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे. राज्यातील मच्छीमारांना राज्याच्या जलाधिक्षेत्राच्या १२ नॉटिकल सागरी मैलाच्या बाहेर मासेमारी करणाऱ्या ६५० मच्छीमार बोटींना याआधीच अॅक्सेस पास देण्यात आले आहेत. यामध्ये पर्ससीन, गीलनेट, टॉलनेट, दालदी आदी पध्दतीने मासेमारी करणाऱ्या बोटींचा समावेश आहे. दरम्यान पावसाळी मासेमारी बंदी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या सात मच्छीमार बोटींवर कारवाई करण्यात आली असल्याचेही उपायुक्त नवनाथ भदुले यांनी सांगितले.

ड्रोन
Raigad News | पोलादपुरातील दुर्गम शाळांची पं. स. सभापतींकडून अचानक पाहणी; शिक्षक अनुपस्थितीवर संताप, कारवाईचे आदेश

घुसखोरी रोखणे गरजेचे

राज्याच्या जलाधिक्षेत्राच्या १२ नॉटिकल सागरी मैलाच्या आत घुसखोरी करणाऱ्यांवर करडी नजर ठेवण्यासाठी ९ ड्रोन तैनात करण्यात आले आहेत. तसेच घुसखोरी रोखण्यासाठी कोस्ट गार्डचीही मदत घेतली जात असल्याची माहिती मत्स्य विभागाचे उपायुक्त नवनाथ भदुले यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news