रायगडमध्ये आज ‘मच गया शोर’, 8 हजार दहीहंड्या फुटणार

Dahi Handi 2024 | लाखोंच्या बक्षिसांसाठी गोविंदा पथकांमध्ये चुरस
Dahi Handi 2024
रायगडमध्ये आज 8 हजार दहीहंड्या फुटणारpudhari photo
Published on
Updated on

रायगड : मंगळवारी सर्वत्र गोपाळकाला साजरा होत आहे. डीजेच्या तालावर ताल धरीत, राजकीय पुढार्‍यांनी पुरस्कृत केलेले विविध रंगी टी-शर्ट घालून थरावर थर रचून लाखो रुपयांची बक्षिसे जिंकण्यासाठी गोविंदा पथके सज्ज झाली आहेत. हा थरार पाहण्यासाठी रायगडकरांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. गोकुळाष्टमीनिमीत्त मंगळवारी जिल्ह्यात 8 हजार 509 दहीहंड्या फोडण्यात येणार आहेत. सर्वाधिक दहीहंडया अलिबाग तालुक्यात (1120) आहेत. यामध्ये राजकीय नेत्यांनी आयोजित केलेल्या लाखो रुपये बक्षीसाच्या काही दहीहंड्या लक्षवेधी ठरणार आहेत. उत्सवादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात येणार आहे.

रायगड जिल्ह्यात दरवर्षी दहीहंडी हा उत्सव ‘सण’ म्हणूनच साजरा करण्याची पद्धत होती. मात्र गेल्या काही वर्षांपासून हा सणच राजकीय पक्षांनी हायजॅक केला असून, त्याचा फायदा घेण्यासाठी राजकीय मंडळींमध्येच जोरदार स्पर्धा सुरू झालेल्या दिसून येतात. परिणामी दहीहंडी उत्सवाला व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यातच आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लाखो रुपयांच्या बक्षिसांची उधळण करण्याची शक्कल राजकीय पदाधिकार्‍यांनी लढविली आहे. त्यामुळे दहीहंडी फोडण्यासाठी लाखो रुपयांची बक्षीसे लावण्यात आली आहेत.

Dahi Handi 2024
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त देशभरात तब्‍बल २५ हजार कोटींची उलाढाल

रायगड जिल्ह्यात 8 हजार 509 दहीहंड्या उभारण्यात येणार आहेत. यामध्ये 6 हजार 641 खासगी तर 1 हजार 868 सार्वजनिक दहीहंड्यांचा समावेश आहे. उत्सवानिमित्त काही ठिकाणी सकाळी तर काही ठिकाणी दुपारपासून मिरवणुका काढल्या जाणार आहेत. एकूण 177 ठिकाणी मिरवणूका पारंपारिक पध्दतीने काढल्या जाणार असून या दिवशी मनोरंजनाचे कार्यक्रमही आयोजित केले आहेत.

जिल्ह्यात ठिकठिकाणी दहीहंडी फोडण्यासाठी मोठमोठ्या रकमेची बक्षीसे लावण्यात आली आहेत. यामुळे या दहीहंड्या फोडण्यासाठी गोविंदा पथकांनी मागील महिनाभरापासून कसून सराव केला आहे. आयोजकही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेत आहेत. दहीहंडी उत्सवाच्या अटींचे पालन करण्यात येत आहे. गोविंदांचा विमा काढण्यात आला आहे.

एकीकडे गोकुळाष्टमीला स्पर्धेचे स्वरुप आले असले तरी ग्रामीण भागात पारंपरिक पद्धतीने गोपाळकाला साजरा होत आहे. आदल्या दिवशी श्रीकृष्ण जन्म आणि दुसर्‍या दिवशी पारंपरिक वाद्यांसह पूजाअर्चा होताना आजही दिसून येत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news