रायगड: महाडमध्ये अवकाळी पावसाची हजेरी | पुढारी

रायगड: महाडमध्ये अवकाळी पावसाची हजेरी

महाड, पुढारी वृत्तसेवा : महाड तालुक्यातील विविध भागात आज (दि.१५) सायंकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. हवेत उष्म्या वाढल्याने घामाच्या धारा अंगातून निघत होत्या. या पावसामुळे उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. यामुळे काहिली काहीशी कमी झाली.

महाड तालुक्यातील वाळण विभाग, विन्हेरे खोरा, पाचाडसह इतर गावात पावसाने दमदार हजेरी लावली. पावसानंतर उकाड्यात पुन्हा वाढ झाल्याने घामाच्या धारा वाहू लागल्या होत्या. पाचाड परिसरात पावसाचे मोठे टपोरे सरी पडल्या. तर विन्हेरे भागात वाऱ्यासह पावसाने दमदार हजेरी लावली. या पावसाने नागरिकांसह शेतकरी वर्गाची एकच धांदल उडाल्याचे चित्र पाहावयास मिळाले.

आंबा, काजूचे मोठे नुतसान झाले. जोरदार पावसात झाडावरील कैऱ्या गळून पडल्या. त्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

हेही वाचा 

Back to top button