Raigad Lok Sabha Election : शिवसेना-सुनील तटकरे यांचे मनोमिलन होणार का? | पुढारी

Raigad Lok Sabha Election : शिवसेना-सुनील तटकरे यांचे मनोमिलन होणार का?

माथेरान : मिलिंद कदम :  रायगड लोकसभा मतदार संघासाठी महायुतीचे उमेदवार म्हणून खासदार सुनील तटकरे यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर झाली खरी पण त्याचे तीव्र पडसाद कर्जत तालुक्यात उमटू लागलेले आहे.रायगड लोकसभा मतदार संघात कर्जत मतदार संघाचा समावेश नसतानाही तटकरेंच्या विरोधात शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गट यांनी परस्परांवर आरोप,प्रत्यारोप सुरु केल्याने आगामी काळात होणार्‍या विधानसभा निवडणुकीत याचे तीव्र परिणाम दोन्ही पक्षांना भोगावे लागतील अशी चर्चा आतापासूनच सुरु झालेली आहे. कर्जत तालुका हा मावळ मध्ये येत असला तरी कर्जत तालुक्याचा प्रभाव रायगड मतदार संघात दिसून येणार हे निश्चित असून कर्जत मधील शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी तटकरेंच्या कार्यप्रणालीवर नाराज असल्याचे उघडपणे बोलून दाखवीत आहेत. ( Raigad Lok Sabha Election )

कर्जतच्या राजकीय घडामोडी आता वाढू लागले असून राजकीय वजन वाढविण्यासाठी येथील पदाधिकारी यांच्यामध्ये चुरस लागल्याचे सध्या कर्जत मध्ये दिसून येत आहे . राष्ट्रवादी, भाजप व शिवसेना चे दोन्ही गट यांच्यामध्ये सध्या राजकीय वर्चस्वाची लढाई सुरू झाली असून लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथे पत्रकार परिषदांना आता जोर धरू लागला आहे व याद्वारे एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. यावेळी होणारी लोकसभेची निवडणूक रंजक होणार असल्याचे चित्र कर्जत तालुक्यात दिसू लागली आहे

दोन दिवसांपूर्वी कर्जत राष्ट्रवादी काँग्रेसने सुधाकर घारे यांच्या कार्यालयामध्ये पत्रकार परिषद घेऊन आमदार महेंद्र थोरवे यांच्या विरोधात पत्रकारांशी बोलताना त्यांना हत्तीच्या पायाखाली देव अशी भाषा केली होती व यामुळेच शिवसेनेत मधील पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचंड प्रमाणात चिडले आहेत. युती धर्म पाळता येत नसेल तर निवडणुकीला समोरासमोर येऊन दाखवा अशी परखड प्रतिक्रिया यावेळी अनेक पद्धती सहकार्याने दिली.

सुधाकर घारे यांना ज्यांनी मोठे केले त्यांच्याच पाठीत खंजर कोसून त्यांनी आपली राजकीय महत्त्वाकांक्षा वाढवली असून त्यांना त्यांची जागा लवकरच दाखवून देणार असे शिवसेना जिल्हाध्यक्ष संतोष भोईर यांनी यावेळी पत्रकार परिषदेत सांगितले.

पत्रकार परिषदेत उपजिल्हाप्रमुख भाई गायकर कर्जत तालुकाप्रमुख संभाजी जगताप, खालापूर तालुकाप्रमुख संदेश पाटील जिल्हा पदाधिकारी गोविंद बैलमारे विधानसभा संघटक शिवराम मध्ये युवा तालुकाप्रमुख अमर मिसाळ महिला पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

महेंद्र थोरवेंचे घुमजाव

आमदार महेंद्र थोरवे यांच्या कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते व त्यामध्ये शिवसेना जिल्हाध्यक्ष संतोष भोईर यांनी पत्रकारांना संबोधित करताना आमदार थोरवे यांच्या वक्तव्याचा चुकीच्या पद्धतीने वापर करून त्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र रचले गेल्याच यावेळी जाहीर केले. खा. सुनील तटकरे यांनी आपली राजकीय भूमिका वेळोवेळी बदलत ठेवलेले असते खासदारकीच्या वेळेला वेगळी भूमिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वेळेला वेगळी भूमिका ही त्यांची प्रवृत्ती मध्ये बदल न केल्यास जनता त्यांचा कडेलोट करेल, परंतु महायुतीचे उमेदवार म्हणून आपण त्यांना विजयी करण्यासाठी प्रयत्नांची पराकष्ट करून या त्यांच्या वक्तव्याचा कर्जत राष्ट्रवादीने वेगळा अर्थ काढला असून खासदार सुनील तटकरे यांचा कडेलोट करणार अशा प्रकारची चुकीची वक्तव्य करून त्यांना नाहक बदनाम करणे केले गेले असे यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले. ( Raigad Lok Sabha Election )

मागील दोन वर्षांमध्ये आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून कर्जतमध्ये अनेक विकास कामे झालेली आहेत. अनेक कामे हे निर्माणधीन आहेत. कर्जत मध्ये पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात विकास कामे होत असल्याने विरोधकांना पोट उठला आहे.त्यामुळे नैराश्यातून ते आमदारांवर आरोप करून स्वतःचे महत्त्व वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु कर्जाची जनता आता शहाणी झालेली असून अशा लोकांना ते वेळीच ठेचून काढतील.
– संकेत भासे, नगरसेवक

Back to top button