Navi Mumbai Drug Disposal | नवी मुंबईत २६.३० कोटींचे ७२६ किलो अमली पदार्थ नष्ट

‘नशामुक्त नवी मुंबई’ अभियानांतर्गत पोलिसांची कारवाई; आतापर्यंत ११३.४४ कोटींचे अंमली पदार्थ नष्ट
Navi Mumbai  Illegal Drugs Seized
Navi Mumbai Illegal Drugs SeizedPudhari
Published on: 
Updated on: 

Navi Mumbai Illegal Drugs Seized

विक्रम बाबर

पनवेल : ‘नशामुक्त नवी मुंबई’ अभियानांतर्गत नवी मुंबई पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधातील कारवाई अधिक तीव्र केली आहे. विविध गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेले ७२६ किलो अंमली पदार्थ, ज्यांची अंदाजे किंमत २६ कोटी ३० लाख रुपये आहे, ते बुधवारी (दि. ३०) कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून नष्ट करण्यात आले. तळोजा येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनीच्या प्रकल्पात ही कारवाई करण्यात आली.

नवी मुंबई पोलिसांकडून अंमली पदार्थांची तस्करी, विक्री आणि सेवनाविरोधात सातत्याने कारवाई सुरू आहे. विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या २०१ गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांच्या विल्हेवाटीची प्रक्रिया यावेळी पूर्ण करण्यात आली. या वेळी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सहपोलीस आयुक्त दीपक साकोरे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

Navi Mumbai  Illegal Drugs Seized
Navi Mumbai Accident: पारसिक हिलवरून चारचाकी थेट रेल्वे रुळावर; नवी मुंबईत विचित्र अपघात

दरम्यान, नवी मुंबई पोलिसांनी आतापर्यंत १९२ गुन्ह्यांमध्ये जप्त केलेले ११३ कोटी ४४ लाख रुपये किमतीचे अंमली पदार्थ नष्ट केले आहेत. अंमली पदार्थांच्या गैरवापराला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून कारवाईसोबतच जनजागृतीवरही विशेष भर देण्यात येत आहे.

शाळा, महाविद्यालये, गृहनिर्माण सोसायट्या आणि सार्वजनिक ठिकाणी अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत आहेत. तरुणांनी अंमली पदार्थांच्या आहारी जाऊ नये, यासाठी नागरिकांनीही सतर्क राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Navi Mumbai  Illegal Drugs Seized
Navi mumbai road accidents : नवी मुंबईत बारा वर्षांत ३४४० जणांचे अपघाती बळी

नवी मुंबई परिसरात अंमली पदार्थांची विक्री किंवा तस्करी होत असल्याची माहिती मिळाल्यास नागरिकांनी ८८२८-११२-११२ या हेल्पलाईन क्रमांकावर माहिती द्यावी. माहिती देणाऱ्या नागरिकांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news