रायगड : अलिबागच्या रूद्रा पिळणकरची सुवर्ण कामगिरी; लाठी स्‍पर्धेत १ सुवर्ण, २ रौप्य | पुढारी

रायगड : अलिबागच्या रूद्रा पिळणकरची सुवर्ण कामगिरी; लाठी स्‍पर्धेत १ सुवर्ण, २ रौप्य

रायगड ; पुढारी वृत्‍तसेवा नुकतीच दिल्ली येथे ४ थी राष्ट्रीय लाठी स्पर्धा २०२४ व दिल्ली ऑलिम्पिक आयोजित एम जी एफ आय दिल्ली २०२४ स्‍पर्धा पार पडली. या स्पर्धेत अलिबागच्या ५ वर्षाच्या रुद्रा विनय पिळणकरने १ सुवर्ण व २ रौप्य पदक पटकावून अलिबागचे नाव देशात उंचावले.

४ थी राष्ट्रीय लाठी स्पर्धा दिल्ली २०२४ मध्ये द्वि अनिखम प्रकारात १ सुवर्ण पदक व एकम लाठी प्रकारात १ रौप्य दिल्ली ऑलिम्पिक आयोजित एम जी एफ आय स्पर्धा दिल्ली २०२४ मध्ये एकम लाठी प्रकारात १ रौप्य पदक पटकावले.

रुद्राला या खेळासाठी प्रियंका संदेश गुजाळ, शुभम महेंद्र नखाते, वेदांत संदेश सुर्वे, सिद्धार्थ अशोक पाटील, माही खमिस यांचे मोलाचे प्रशिक्षण लाभले. या चमकदार कामगिरीमुळे सर्व क्षेत्रातून रुद्राचे कौतुक होत आहे.

हेही वाचा : 

Back to top button