Raigad Crime : सत्तर वर्षीय वृद्धाचा बालिकेवर अत्याचार

तळोजा येथील संतापजनक घटना , आरोपीसह आईलाही अटक
 Minor girl abuse case |
सत्तर वर्षीय वृद्धाचा बालिकेवर अत्याचार File Photo
Published on
Updated on

पनवेल ः लंडनमध्ये राहणाऱ्या एका 70 वर्षीय वृद्धाने भारतात येऊन अवघ्या दहा वर्षांच्या अल्पवयीन बालिकेवर तब्बल दोन वर्षांपासून वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा अत्यंत किळसवाणा प्रकार समोर आला आहे. या घटनेतील सर्वात धक्कादायक आणि संतापजनक बाब म्हणजे, या संपूर्ण अत्याचाराच्या प्रकरणात त्या चिमुरडीची जन्मदात्री आईच आरोपीला सक्रियपणे मदत करत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने केलेल्या तपासात पैशांच्या लालसेपोटी हा माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार घडल्याचे आढळुन आले आहे. पोलिसांनी या नराधम आरोपीसह पीडित बालिकेच्या निर्दयी आईलाही अटक केली आहे.

या प्रकरणात अटक करण्यात तो मुळचा पाँडेचेरी येथील रहिवाशी आहे. मात्र सध्या तो लंडन येथे फारुक अल्लाउद्दीन शेख असे असून कुटुंबासह स्थाईक आहे तो दोन तीन महिन्यातून एकटा लंडन येथून दोन तीन दिवसासाठी येत होता. यादरम्यान पीडित मुलीच्या आईसोबत त्याची घरकामाच्या निमित्ताने ओळख झाली होती, आरोपी फारुक शेख लंडन येथून तळोजा येथे आल्यास पीडित मुलीशी आई आपल्या दहा वर्षाच्या मुलीला त्याच्या घरी खेळण्याच्या बहाण्याने सोडुन निघुन जात होती. या दरम्यान आरोपी पीडित मुलीला मद्य पाजुन तिच्यावर लैंगिक अमानुषपणे अत्याचार करत होता. जर तिने कोणाला सांगितले, तर जीवे मारण्याची धमकी देऊन तिला गप्प बसवत होता. गेल्या दोन वर्षांपासून हा प्रकार सुरु होता.

काही दिवसापुर्वी आरोपी फारुक शेख हा लंडन येथून तळोजा येथे आपल्या फ्लॅटवा आला होता. त्यानंतर त्याने पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यास सुरुवात केली होती. याबाबातची माहिती नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश देशमुख, निलम पवार, सरिता गुडे, आदींच्या पथकाने या नराधमाच्या फ्लॅटवर छापा मारला, त्यानंतर आरोपी फारूक शेख याला ताब्यात घेऊन पीडित मुलीची सुटका केली. मुख्य आरोपी फारुक अल्लाउद्दीन शेख आणि त्याला साथ देणारी पीडित मुलीची जन्मदात्री आई या दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण तळोजा परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

रेशनसाठी आईनेच विकले

अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्ष व तळोजा पोलिसांनी पीडित मुलीच्या आईकडे चौकशी केली असता, त्यांनाही धक्का बसला. पीडित मुलीच्या आईने आरोपी फारुक शेख याच्याकडुन घर भाड्याने घेण्यासाठी अडीच लाख रुपये घेतले होते, त्याचप्रमाणे दर महिन्याचे रेशन धान्य देखील फारुककडून मिळणान्या रकमेतूनच ती खरेदी करत होती. या पैशांसाठी ती आपल्या 10 वर्षाच्या मुलीला वारंवार फारुकच्या घरी पाठवत असल्याचे तपासात उपड झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news