रायगड : ७ वर्षाची शर्विका बनली दुर्ग लिंगाण्याची विरंगणा

चिमुकलीची १२१ व्या गडाला गवसणी
Raigad News
७ वर्षाची शर्विकाने लिंगाणा किल्ल्याला गवसणी घातली
Published on
Updated on

रायगड : जागतिक विक्रमवीर आणि महाराष्ट्राची हिरकणी म्हणून प्रसिद्ध असलेली रायगड जिल्ह्यातील अलिबागची कन्या कु. शर्विका अमृता जितेन म्हात्रे हिने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येलाच आणखी एक चमकदार कामगिरी केली आहे. सर्वात कठीण असलेला लिंगाणा हा गड तिने सर केला आहे.

लिंगाणा हा दुर्ग महाराष्ट्रातील सर्वात कठीण दुर्ग म्हणून ओळखला जातो. सह्याद्री डोंगररांगेतील पुणे आणि रायगड जिल्ह्याच्या दुर्गम वाटेवर असलेला हा दुर्ग स्वराज्याचे कारागृह म्हणून देखील प्रसिद्ध आहे. या गडाच्या पायथ्याशी जाणारी वाट देखील थरारक आहे. परंतु, यावर मात करत शर्विकाने ही मोहीम फत्ते केली आहे. या मोहिमेत तिच्यासोबत १६ गिर्यारोहकांचा देखील समावेश होता.

कठीण गडांच्या मोहिमेसाठी शर्विका राजे शिवाजी वॉल क्लाइंबिंग,पुणे या संस्थेच्या माध्यमातून अमोल जोगदंड आणि मांतू मंत्री या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाने गेल्या दोन वर्षापासून सातत्याने ती प्रशिक्षण घेत आहे. या संस्थेच्या माध्यमातून एवरेस्ट वीर लहू उघडे यांच्या माध्यमातून या मोहिमेचे आयोजन केले होते. याच संस्थेतील गिर्यारोहक तुषार आणि केदार यांच्या माध्यमातून ही मोहीम विविध सुरक्षा उपकरणांच्या साहाय्याने यशस्वीपणे पार पडली. या मोहिमेनंतर पुन्हा एकदा शर्विकाने आपले नाव सह्याद्रीच्या प्रवासात अधोरेखित केले आहे, त्यामुळे तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news