

कर्जत: पुढारी वृत्तसेवा : कर्जत- खालापूर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे माजी आमदार सुरेश लाड यांनी आज (दि.१६) भाजपमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत नागपुरात हा प्रवेश सोहळा झाला. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार प्रशांत ठाकूर, चित्रा वाघ आदी उपस्थित होते. Suresh Lad
तीन वेळा आमदार म्हणून निवडून आलेले माजी आमदार सुरेश लाड यांच्या मागे मोठा जनाधार आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यात भाजपची ताकद वाढण्यास मदत होणार आहे, असे सूतोवाच आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी केले. Suresh Lad
रायगड जिल्ह्यातून उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, दक्षिण रायगडचे सरचिटणीस सतीश धारप, उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष वसंतराव भोईर , उत्तर रायगड जिल्ह्याचे सरचिटणीस दीपक बेहेरे, कर्जत तालुका अध्यक्ष राजेश भगत, रायगड संयोजक नितीन कांदळगावकर, रायगड जिल्हा चिटणीस मंगेश म्हसकर , कर्जत विधानसभा निवडणूक प्रमुख किरण ठाकरे, किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील गोगटे आदी उपस्थित होते.
Suresh Lad भाजप प्रवेशाने सुरेश लाड यांना राजकीयदृष्ट्या मिळाली नवसंजीवनी …..
2019 च्या विधानसभा निवडणुकीत सुरेश लाड यांना पराभव पत्करावा लागला. तीन वेळा आमदार राहिलेल्या लाड यांच्या हा पराभव फार जिव्हारी लागला. या पराभवाला अप्रत्यक्षरीत्या त्यावेळचे राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे हेच जबाबदार असल्याचे मत लाड यांनी अनेकवेळा व्यक्त केले. त्यांची तटकरे यांच्याशी असलेली मैत्रीही संपुष्टात येऊन दुरावा निर्माण झाला होता. त्यातच तटकरे हे त्याच पक्षातील सुधाकर घारे यांना अधिक राजकीय बळ देत असल्याचे सुरेश लाड यांच्या लक्षात आल्याने त्यांनी वर्षभरापूर्वीच राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून ते अन्य पक्षात जाण्याच्या विचारात होते.
मात्र, त्यांना पुन्हा विधानसभा लढविण्याची इच्छा असल्याने ते सुरक्षित पक्ष शोधात होते. कारण शिंदे शिवसेनेत गेल्यास तेथे विद्यमान आमदार महेंद्र थोरवे हे आगोदरच पुढील निवडणुकीसाठी तयार आहेत. तर अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीत पक्षात जावे. तर तेथे पुन्हा सुनील तटकरे आलेच आणि तेथे सुधाकर घारे हे सुद्धा विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे भाजप हाच एकमेव पक्ष लाड यांना पर्याय म्हणून दिसून आल्याने त्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला.
माजी आमदार सुरेश लाड यांच्या पक्ष प्रवेशामुळे भाजपही आता कर्जत विधानसभा मतदार संघावर दावा सांगू शकतो, हे नक्की.
हेही वाचा