रायगड : ऑलिव्ह रिडले कासावाची ६८ पिल्ले झेपावली समुद्रात

समिर शिंदे यांची माहिती
Raigad wildlife news
ऑलिव्ह रिडले कासावाची ६८ पिल्ले समुद्रात झेपावली pudhari photo
Published on
Updated on

रायगड : अलिबाग जवळच्या सुप्रसिद्ध किहीम समुद्र किनार्‍यांवरुन ऑलिव्ह रिडले कासावाची ६८ पिल्ली शुक्रवारी (दि.२५) समुद्रात झेपावली. याची माहिती रायगड कांदळवन कक्ष-वन अधिकारी समिर शिंदे यांनी दैनिक पुढारीशी बोलताना दिली.

४ मार्च रोजी या किनार्‍यावर सागरी कासवाच्या मादीने घरटे केले होते. या घरट्याचे संरक्षण करण्यात आले होते. या घरट्यामधून शुक्रवारी बाहेर पडलेली ही ६८ पिल्ली कांदळवन कक्षाचे अधिकारी, किहीमचे सरपंच प्रसाद गायकवाड आणि ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत समुद्रात सोडण्यात आली. कोकण किनारपट्टीवरील रत्नागिरी, सिंधुदूर्ग आणि रायगड या जिल्ह्यांमधील किनार्‍यांवर ऑलिव्ह रिडले समुद्री कासवांची घरटी आढळतात. रायगडमधील चार, रत्नागिरीतील २३ आणि सिंधुदुर्गमधील ३० किनार्‍यांवर आलिव्ह रिडेल प्रजातीच्या माद्या अंडी घालण्यासाठी येतात. रायगडमधील दिवेआगर, श्रीवर्धन, हरिहरेश्वर आणि मारळ या उत्तरेकडील किनार्‍यांवर सागरी कासवांची घरटी प्रामुख्याने आढळतात. मात्र, ४ मार्च रोजी अलिबाग तालुक्यातील किहीमच्या किनार्‍यावर सागरी कासवाचे घरटे आढळून आले. दुपारी २ च्या सुमारास ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या मादीने भर उन्हात लोकांच्या समक्षच किनार्‍यावर खड्डा करुन त्यात अंडी घातली होती.

कांदळवन कक्ष-दक्षिण कोकण विभागाकडून या घरट्याचे संपूर्ण सरक्षण करण्यात आले होते. संरक्षित केलेल्या या घरट्यामधून शुक्रवारी ५२ दिवसांनी पिल्लांचा जन्म झाला. शुक्रवारी सकाळी आणि त्यानंतर सायंकाळी बाहेर पडलेल्या अशा एकूण ६८ पिल्लांना वन कर्मचार्‍यांनी स्थानिक गावकर्‍यांच्या मदतीने समुद्रात सोडले. हे घरटे इन-सेटू पद्धतीने संरक्षित करण्यात आले होते, म्हणजेच अंड्यांना आहे त्याच ठिकाणी ठेवून त्याभोवती जाळी लावून घरट्याला संरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे त्यात नेमकी अंडी होती आणि त्यातून अजून किती पिल्लं बाहेर पडू शकतात याचा अंदाज देता येता नाही, अशी माहिती कांदळवन कक्ष-दक्षिण कोकण विभागाच्या विभागीय वन अधिकारी कांचन पवार यांनी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news