रायगड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर दरड कोसळल्याने प्रशासन अलर्ट मोडवर | पुढारी

रायगड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर दरड कोसळल्याने प्रशासन अलर्ट मोडवर

महाड; पुढारी वृत्तसेवा : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर दासगाव नजीकच्या रस्त्यावर दरड कोसळली. यामुळे वाहतुकीला खोळंबा निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या पोलिसांनी तातडीने या ठिकाणी दक्षता घेण्यासंदर्भात कार्यवाही सुरू केली आहे .

सायंकाळी सातच्या सुमारास या ठिकाणी काही दगड व झाडे रस्त्यावर आल्याचे निदर्शनास येतात मार्गावरून प्रवास करणाऱ्यांनी महाड शहरा नजीक असलेल्या महामार्ग वाहतूक पोलीस शाखेशी संपर्क साधून याची माहिती दिली. त्यानंतर तातडीने पोलीस प्रशासन व स्थानिक आपत्ती विभाग महसूल यंत्रणेने घटनास्थळी धाव घेतल्याची माहिती महाड तालुका आपत्ती व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहे. या संदर्भात अत्यावश्यक असलेल्या सर्व बाबींची पूर्तता तातडीने केली जाईल अशी माहिती महाडचे तहसीलदार शितोळे यांनी दिली आहे.

Back to top button