रायगड : पनवेल महानगरपालिका हद्दीत डेंग्यूचा धोका! तिघांचा मृत्यू | पुढारी

रायगड : पनवेल महानगरपालिका हद्दीत डेंग्यूचा धोका! तिघांचा मृत्यू

पनवेल; विक्रम बाबर : पनवेल महानगरपालिका हद्दीत डेंग्यू रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. या आजारामुळे मृतांचा आकडा देखील वाढू लागला आहे. मंगळवारी (दि. २१) या डेंगूमुळे तिघांचा मृत्यू झाला आहे. या तिघांच्या मृत्यूमुळे पालिका हद्दीतील मृतांची संख्या चारवर पोहोचली आहे. हे मृत रुग्ण पनवेल शहर, कामोठे आणि रोहिजन गावातील आहेत. उपचारा दरम्यान या रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

पावसाळा सुरू झाल्यानंतर शहर तसेच ग्रामीण भागात डेंग्यू, मलेरिया, ताप, खोकला या सारखे संसर्गजन्य आजार पसरलेले दिसून येतात. सध्या हेच चित्र पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीत दिसून येत आहे. पालिका हद्दीत संसर्गजन्य रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. यामध्ये प्रामुख्याने डेंग्यूच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यात पालिका हद्दीत डेंग्यूच्या रुग्णांची संख्या ही 33 इतकी होती, मात्र अवघ्या काही दिवसातच या संख्येने ५०० चा आकडा पार केला आहे. तर तीन रुग्णांचा डेंग्यूने मृत्यू झाला आहे. डेंग्यू झाल्यानंतर या रुग्णांवर पालिका हद्दीतील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारा दरम्यान या तीन ही रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हे तीन ही मृत रुग्ण हे पनवेल, कामोठे आणि रोहिजन गावातील आहेत, या मृत्यूमुळे पालिका हद्दीतील मृतांचा आकडा हा चार वर पोचला आहे. त्या मुळे रहिवाशियानी योग्य ती काळजी घेऊन उपाययोजना कराव्यात हे आवाहन पालिकेने केले आहे.

पालिका हद्दीत तापावर उपचार घेणारे 37 हजार 873 रुग्ण

पालिका हद्दीत तापाच्या आजाराने सध्या रहिवाशी बेजर झाले आहे. या मध्ये डेंगू , मलेरिया , टायफाईड तसेच व्हायर फिवर चा समावेश आहे. जवळपास 37 हजारा हुन अधिक रुग्ण हे तापावर उपचार घेत असल्याची नोंद पालिका दफतरी आहे. या मध्ये डेंगू आणि मलेरिया चे 716 रुग्ण आहेत.

Back to top button