JNPT Container Issue : बंदरात कंटेनर अडकल्याने वृत्तपत्र छपाईवर परिणाम

जेएनपीए बंदरात वृत्तपत्र छपाईसाठी आयात केलेले कागदांचे 4000 कंटेनर अडकले
JNPT Container Issue
बंदरात कंटेनर अडकल्याने वृत्तपत्र छपाईवर परिणामpudhari photo
Published on
Updated on

कोप्रोली : जेएनपीटी बंदरात परदेशातून राज्यातील वृत्तपत्रांसाठी लागणाऱ्या कागदांचे आयात करण्यात आलेले सुमारे 4000 हजार कंटेनर अडकून पडले आहेत. मागील 14 दिवसांपासून अडकून पडलेल्या या कंटेनरमुळे मात्र राज्यातील वृत्तपत्र व छपाई व्यवसाय अडचणीत सापडला आहे. जेएनपीए अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला असून वाहनचालकांच्या तुटवड्यामुळे ही वेळ आली असल्याचे त्यांनी सांगितले.

मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थिती आता कमी अधिक प्रमाणात नियंत्रणात आली आहे. यामुळे महाराष्ट्रातील विविध छपाई कंपन्यांच्या माध्यमातून परदेशातुन वृत्तपत्र छपाईसाठी रशिया, कॅनडा, सिंगापूर, मलेशिया, आफ्रिका, युरोपातुन कागद आयात करण्यात आलेला आहे. मात्र कोट्यवधींचा छपाईचा कागद जेएनपीए बंदरात मागील 14 दिवसांपासून अडकून पडलेला आहे.

JNPT Container Issue
Parbhani News : महावितरणचा नवाकोरा डीपी चार तासांतच जळून खाक

जेएनपीए अंतर्गत बंदरातील कंटेनर वाहतूक करणारी यंत्रणा कोलमडल्यानेच ही वेळ येऊन ठेपली आहे. यामुळे मात्र राज्यातील वृत्तपत्र छपाई करणाऱ्या कंपन्या अडचणीत सापडलेल्या आहेत.

JNPT Container Issue
India Agriculture Export: आखाती युद्धामुळे शेतीमाल अडकला; 44 भारतीय जहाजे ठप्प

जेएनपीए बंदरात परदेशातुन विविध कंपन्यांच्या माध्यमातून वृत्तपत्र छपाईसाठी आयात करण्यात आलेले सुमारे चार हजार कंटेनर मागील 14 दिवसांपासून अडकून पडले आहेत. 4000 कंटेनरमधुन एक लाख टन आणि 460 कोटी किंमतीचा कागद बंदरात अडकून पडलेला आहे. अडकलेले कंटेनर बंदराबाहेर काढून विविध सीआयएफएसमध्ये पाठविण्यासाठी बंदर प्रशासनाला साकडे घातले आहे. मात्र कंटेनर बाहेर काढण्याचे काम अद्यापही संथगतीने सुरू आहे. यामुळे वृत्तपत्र वछपाई व्यवसाय अडचणीत सापडला आहे.

कैलास आवटे, आयातदार टायटॅनिक ओशिएन सर्व्हिसेस कंपनीचे ऑपरेशन हेड

बंदरातील विविध सीआयएफएसमध्ये काम करणारे सुमारे दोन हजार कंटेनर ट्रेलरवरील वाहनचालक पश्चिम बंगाल, युपी, बिहार निवडणुकीच्या कामासाठी दोन महिन्यांपासून राज्यात गेले आहेत. वाहनचालकांना निवडणुकीनंतर माघारी येण्यास विलंब होत चालला आहे. या विलंबामुळे मात्र कागदाचे आयात करण्यात आलेले सुमारे चार हजार कंटेनर अडकून पडले आहेत.जेएनपीएने अडकून पडलेले कागदी मालाचे आयात कंटेनर बंदराबाहेर काढण्यासाठी तुर्तास अतिरिक्त वाहनचालकांची व्यवस्था केली आहे.येत्या 25 मे पर्यंत वृत्तपत्र कागदाचे कंटेनर बंदराबाहेर काढण्यासाठी सर्वोतोपरी प्राधान्य दिले जाणार.

गिरीश थॉमस, जेएनपीएचे कंटेनर वाहतूक विभागाचे वरिष्ठ अधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news