पनवेल : बदलीसाठी १ लाख रुपये लाच घेताना पोलीस निरीक्षक ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात | पुढारी

पनवेल : बदलीसाठी १ लाख रुपये लाच घेताना पोलीस निरीक्षक 'लाचलुचपत'च्या जाळ्यात

पनवेल: पुढारी वृत्तसेवा : पोलीस कर्मचाऱ्यांची इच्छितस्थळी बदली करण्यासाठी १ लाख रुपयाची लाच घेताना पोलीस निरीक्षक रामचंद्र नारायण वारे (वय ५८) यांना रंगेहाथ अटक केली. ते महामार्ग सुरक्षा पथक पनवेल विभागात कार्यरत होते. ही कारवाई पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (दि. 20) केली.

पोलीस निरीक्षक वारे यांनी पोलीस दलातील आपले सहकारी अधिकारी तसेच कर्मचारी यांची इच्छितस्थळी बदली करण्यासाठी २ कर्मचाऱ्यांकडून १ लाख रुपयांची मागणी केली होती. १ लाख दिल्यानंतर तत्काळ बदली होईल, अशे आश्वासन वारे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार दोन पोलीस कर्मचारी, अधिकाऱ्यांनी १ लाख रुपयांची जुळवाजुळव  केली होती.

दरम्यान, या पोलीस अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती पालघर लाचलुचपत विभागाला दिली होती. वारे यांनी पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना पैसे घेऊन केबिनमध्ये बोलवले होते. त्यानुसार लाचलुचपतच्या पथकाने मंगळवारी सापळा रचून वारे यांना त्यांच्या केबिनमध्ये लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली.

हेही वाचलंत का ? 

Back to top button