27 Anganwadis in Alibag to become smart-अलिबागच्या सत्तावीस अंगणवाड्या होणार स्मार्ट

आदर्श अंगणवाडी केंद्रांत रूपांतर करण्यासाठी शासन सकारात्मक
Smart Anganwadi
Smart AnganwadiPudhari
Published on: 
Updated on: 

अलिबाग : पुढारी वृत्तसेवा

ग्रामीण आणि आदिवासी भागातील बालकांनाही आधुनिक, दर्जेदार आणि आनंददायी पूर्वप्राथमिक शिक्षणाच्या सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार जयंत पाटील यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे. अलिबाग तालुक्यातील २७ अंगणवाडी केंद्रांचे आदर्श स्मार्ट अंगणवाडी केंद्रांमध्ये रूपांतर करण्याच्या दृष्टीने शासनाने सकारात्मक निर्णय घेतला असून, प्रत्येक केंद्रासाठी १ लाख ६५ हजार रुपयांच्या मयदित स्मार्ट अंगणवाडी किट खरेदी करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे तालुक्यातील अंगणवाड्यांचे आधुनिकीकरण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी केंद्रांमधून बालकांना आरोग्य सेवा, पूरक पोषण आहार आणि पूर्वप्राथमिक शिक्षणाच्या सुविधा पुरविल्या जातात. मात्र, बदलत्या काळानुसार या सुविधांचा दर्जा उंचावणे आणि ग्रामीण भागातील बालकांनाही शहरी भागातील मुलांप्रमाणे आधुनिक शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. ही गरज लक्षात घेऊन जयंत पाटील यांनी अलिबाग तालुक्यातील २७ अंगणवाड्यांचे स्मार्ट अंगणवाड्यांमध्ये रूपांतर करण्याची मागणी शासनदरबारी तसेच विधिमंडळाच्या सभागृहात सातत्याने लावून धरली होती.

अंगणवाडी हे केवळ पोषण आहार वाटपाचे केंद्र नसून बालकांच्या शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकासाचा पाया घडविणारे महत्त्वाचे व्यासपीठ आहे. बालकांचे वय, क्षमता आणि आकलनशक्ती लक्षात घेऊन त्यांना खेळातून शिक्षण, विविध शैक्षणिक साहित्य आणि पोषक वातावरण मिळणे आवश्यक आहे. त्याचबरोबर महिला आणि किशोर वयीन मुलींसाठी पोषण, आरोग्य आणि कौशल्यवि-कासाच्या उपक्रमांमध्येही अंगणवाडी केंद्रांची भूमिका महत्त्वाची आहे. याच व्यापक दृष्टिकोनातून जयंत पाटील यांनी अंगणवाड्यांच्या आधुनिकीकरणाचा विषय विधिमं-डळात सातत्याने उपस्थित केला होता. या निर्णयामुळे अलिबाग तालुक्यातील २७ अंगणवाड्यांच्या आधुनिकीक-रणाला चालना मिळणार आहे.

या अंगणवाड्यांचा समावेश...

अलिबाग तालुक्यातील सागवाडी, वावे, तळवली, रेवदंडा, कोळगाव, शिरवली, झालखंड, खिडकी, घसवड, खुटळवाडी, वाघोली आदिवासीवाडी, बारशेत, वाढगाव आदिवासीवाडी, नवेनगर, सुतारपाडा, कावीर, खैरवाडी, फोफेरी, चिंचवली, देहेन, रांजणखार, बोपोली, डांगी, कोळघर, मुळे, थळ, अंदोशी आणि घोटवडे येथील अंगणवाड्यांचा या उपक्रमात समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.