

खारघर : आरोपीच्या मुलासोबत लग्न करण्यास नकार दिल्याने आरोपीने सतरा वर्षीय मुलीची कुकर आणि चाकूने वार करून हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मोहम्मद शहीद मिस्त्री (44, राहणार उल्हासनगर) याला अटक केली.
यातील फिर्यादी ह्या आणि आरोपी मोहम्मद मिस्त्री हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. आरोपीचा मुलगा याला या मुलीसोबत लग्न करायचे होते. मात्र त्याला नकार दिल्याने आरोपी आणि मुलीच्या आई-वडिलांसोबत वाद सुरू झाले.
19 सप्टेंबर रोजी आरोपी मोहम्मद मिस्त्री याने तिच्या घरी जात मुलीच्या डोक्यावर कुकरने वार केले आणि चाकूने गळ्यावर वार केले. यात तिचा मृत्यू झाला. तळोजा पोलिसांनी 6 पथक तयार केले. तांत्रिक तपासाद्वारे पोलिसांनी 12 तासांच्या आत उल्हासनगरच्या दिशेने पळून जाताने आरोपी मिस्त्रीला ताब्यात घेतले.