पेण तालुक्याच्या खाडीपट्ट्यातील आगरी कोळी लोकांचा 40 वर्षापूर्वीचा मुळ व्यवसाय भाताचे पीक आणि मिठागरे होय. आता मात्र वाढत्या औद्योगिकीकरणामुळे, राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणामुळे हा व्यवसाय नामशेष होत आहे. एकेकाळी कामगारांनी गजबजलेली येथील मिठागरे आता कायमची ओस पडली आहेत. पेण तालुक्यात 30 ते 40 मिठागरांतून आता जेमतेम 5 ते 6 आगारे शिल्लक राहिली आहेत. भविष्यात मिठागरांचा इतिहास पुसला जाणार आणि यापुढे शालेय जीवनात मिठागरे केवळ कागदावरच पाहायला मिळणार की काय, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
पेण तालुका हा पुर्वीपासुनच भाताचे कोठार म्हणून संबोधले जात होते. मात्र खार्या पाण्यामुळे नापिक होत चाललेल्या जमिनींमुळे तसेच गडब, डोलवी, वडखळ या भात पीक घेणार्या क्षेत्रात औद्योगिकीरण वाढल्यामुळे येथील भात पीक नष्ट झाले. हे भाताचे कोठार पुसले जात असून आता वाढत्या प्रभावामुळे पेणची मिठागरेही आता नष्ट होवु लागली आहेत.
तालुक्यात वडखळ, बोरी, शिर्की,वाशी येथील मिठाची चांगली शेती आहे. जस जसा उन्हाळा तापत जातो तसतसे मीठ अधिक जोमाने पिकविले जाते. हे त्या मिठाचं वैशिष्ट आहे. मीठ पावसाळ्यात विरघळु नये म्हणून पावसाळ्यात मे च्या अखेरीस मिठांच्या राशी करून त्या व्यवस्थित पेंढयाने बांधुन ठेवण्यात येतात. परंतु दरवषाप्रमाणे अनेक मिठाच्या राशी पाहायला मिळत नाहीत. .
तालुक्यात येणार्या औद्योगिकरण, कारखानदारी आणि भराभर जमीन विक्रीचे होत चाललेले परिणाम यामुळे सरकारचे मिठागरांकडे दुर्लक्ष होत चालले आहे. मीठ हे केवळ स्वयंपाकासाठीच आहे, असे नाही तर त्याचा उपयोग प्रत्येक औद्योगिकरणाच्या वस्तुला, पदार्थाला लागणारे असे मीठ कालांतराने बंद होण्याच्या मार्गावर आहे. मिठागरांच्या येथे मिठांच्या राशीचे डोंगर दिसायचे. पावसाळ्यात कितीही पाऊस पडला तरी योग्य पध्दतीने शिवुन ठेवल्याने त्या राशीत मीठ खराब होणार नाही किंवा विरघळणार नाही याची काळजी घेऊ न पेंढयाने आणि मातीच्या लेपाने त्या राशी व्यवस्थित शिवुन ठेवल्या जात होत्या. परंतु शेकडो मिठाच्या राशीतुन मोजक्याच राशी पहायला मिळतात.
पेण तालुक्यात 30 ते 40 मिठागरांमधून आता जेमतेम 5 ते 6 आगारे शिल्लक राहिली आहेत. भविष्यात मिठागरांचा इतिहास पुसला जाणार आणि यापुढे शालेय जीवनात मिठागरे केवळ कागदावरच पाहायला मिळणार की काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
शेकडो वर्षांपासुन सुरु असलेली ही मिठागरे पुर्वी कित्येक स्थानिकांना रोजगार मिळवून देत होती. आता मिठागरेच बंद पडल्यामुळे स्थानिक व्यावसायिक, मीठ गिरणी कामगार, स्थानिक रोजगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.
कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यात चामड्याच्या चपला तयार करण्याचे जे छोटे-मोठे कारखाने (व्यावसायिक) आहेत. त्यांना मोठ्या प्रमाणावर मीठ लागते आणि हे जास्तीत जास्त मीठ पेणवरुन दळुन जात असे. पण मीठ उत्पादन अचानक कमी झाल्याने मीठ गिरण्याही बंद पडल्या. त्यामुळे अनेकांच्या रोजगारावर संकट आले आहे. त्याचप्रमाणे वाशी, वढाव, बोरी, काश्मिर, मळेघर उचेडे, उंबर्डे येथील स्थानिक मीठ विक्रीचा धंदा करणारे बैलगाडीवाले मीठ विकण्याचा धंदा बंद झाल्याने त्यांचाही व्यवसाय मोडीत निघाला. सध्या पालघर, ठाणे येथुन मीठ आणुन व्यवसाय करावा लागत आहे.
तालुक्यातील 30 ते 40 मिठागरांतुन आता जेमतेम 5 ते 6 आगारातून मीठ पिकविले जात असल्याचे नजरेस पडते. शेकडो वर्षापासुन सुरु असलेल्या मिठागरांमुळे पुर्वी स्थानिकांना रोजगार मिळवुन देत होत्या. आता मिठागरेच बंद पडल्यामुळे स्थानिक व्यावसायिक मीठ गिरणी कामगार, स्थानिक रोजगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. सध्याच्या मिठागरांतून चांगल्या प्रकारे मिठाचं उत्पादन घेतले जात आहे. ती वाचविण्यासाठी आजही पेणच्या मिठाला मागणी असून केंद्र सरकारने ती पुन्हा चालु करावीत .