संविधान वाचविण्यासाठी महाविकास आघाडीसोबत : ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड

संविधान वाचविण्यासाठी महाविकास आघाडीसोबत : ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड

पुणे : पुढारी वृत्तसेवा : देशातील लोकशाही आणि संविधान टिकविण्यासाठी संभाजी ब्रिगेड लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीसोबत आहे, अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी दिली. लोकसभा निवडणुकीसंदर्भातील संभाजी ब्रिगेडची भूमिका गायकवाड यांनी शुक्रवारी पुणे श्रमिक पत्रकार संघात स्पष्ट केली. ते म्हणाले की, सध्याची देशातील परिस्थिती पाहता देश सुरक्षित राहायला हवा. देशाची घटना, येथील लोकशाही व्यवस्था टिकली पाहिजे. हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न भाजपचा आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीनुसार भाजपला हा देश हिंदुराष्ट्र करायचा आहे. मागील लोकसभा निवडणुकीत मी काँग्रेसकडून उमेदवारी मिळविण्याचा प्रयत्न केला होता. आता मात्र सक्रिय राजकारणात माझा उतरण्याचा विचार नाही. तो माझा पिंड नाही, असेही त्यांनी नमूद केले.

महायुतीचे उमेदवार जेथे असतील तेथे आमचा विरोध राहणार आहे. हा आमचा विरोध राजकीय नाही, तर विचारधारेची ही लढाई आहे. भाजपला मनुस्मृतीवर आधारित रचना पुन्हा देशात आणायची आहे. त्यास आमचा विरोध आहे. त्यामुळे संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करतील. फडणवीस-शिंदे सरकारने मराठा समाजाला दिलेले आरक्षण कायद्याच्या चौकटीत टिकणार नाही, हे मराठा समाजाला समजले आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने लोकसभेच्या प्रचारासाठी गावात येणार्‍या राजकीय नेत्यांना मराठा समाजातील कार्यकर्त्यांकडून परत पाठविण्यात येत असल्याचेही गायकवाड म्हणाले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news