बीबीए, बीएमएस, बीसीए नोंदणीसाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ

बीबीए, बीएमएस, बीसीए नोंदणीसाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ

पुणे : पुढारी वृत्तसेवा : व्यवस्थापनशास्त्र पदवी (बीबीए, बीएमएस), संगणक उपयोजन (बीसीए) पदवी अभ्यासक्रमांच्या सीईटीसाठी आत्तापर्यंत 48 हजार 182 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. दरम्यान, या परीक्षेच्या नोंदणीसाठी 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष अर्थात सीईटीसेलने घेतला आहे. एमबीए, एमसीए या व्यावसायिक पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या धर्तीवर बीसीए, बीबीए, बीएमएस हे पदवी अभ्यासक्रम आपल्या अखत्यारित घेण्याचा निर्णय अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) घेतला.

या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची सीईटी राज्य सीईटी सेलकडून घेण्यात येते. त्याच धर्तीवर बीसीए, बीबीए, बीएमएस या पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीही प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेतील गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया होणार आहे. त्यानुसार बीबीए, बीसीए, बीएमएस अभ्यासक्रमांच्या प्रवेशाच्या सीईटीची नोंदणी सुरू करण्यात आली. या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी अनिवार्य आहे. मात्र, राज्यात पहिल्यांदाच होणार्‍या या परीक्षेबाबत अद्याप फारशी जागृती नसल्याने नोंदणीसाठी मुदतवाढ देण्याची गरज शिक्षण क्षेत्रातून व्यक्त करण्यात आली होती.

हेही वाचा

logo
Pudhari News
pudhari.news