पुणे : पुढारी वृत्तसेवा : बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार सोयल शहा शेख यांना तुतारी (ट्रम्पेट) चिन्ह देण्यात आले आहे. या चिन्हावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रतिनिधींनी आक्षेप घेतला होता. सुळे यांच्या प्रतिनिधींचा तुतारी चिन्हाचा आक्षेप निवडणूक आयोगाने फोटाळून लावला आहे. अपक्ष उमेदवाराचे तुतारी (ट्रम्पेट) हे चिन्ह निवडणूक निर्णय अधिकार्यांनी कायम ठेवले आहे.
निवडणूक निर्णय अधिकार्यांनी बारामती लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केली असून, त्यामध्ये तुतारी (ट्रम्पेट) चिन्ह उमेदवाराला कायम ठेवले आहे. दरम्यान, हा अपक्ष उमेदवार 32 व्या क्रमांकावर असल्याने थेट त्याचा मतदानावर प्रभाव पडणार नसल्याचे देखील बोलले जात आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या वतीने लक्ष्मीकांत खाबिया यांनी आक्षेप नोंदविला होता. तुतारी वाजविणारा माणूस आणि तुतारी यांच्या नावात साधर्म्य असल्याचा हा आक्षेप होता. मात्र, बारामती लोकसभा मतदारसंघाच्या मुख्य निवडणूक अधिकारी कविता द्विवेदी यांनी हा आक्षेप फेटाळून लावला.
हेही वाचा