युवक कुकडी नदीपात्रात बुडाल्याने बेपत्ताPudhari
पुणे
Kukadi Drowning : विसर्जनासाठी गेलेला युवक कुकडी नदीपात्रात बुडाल्याने बेपत्ता
गणपतीचे विसर्जन करण्यासाठी तो नदीच्या पात्रात उतरला होता अशी प्राथमिक माहिती
नारायणगाव : जुन्नर तालुक्यातील निमगाव सावा येथील सार्वजनिक गणपतीचे विसर्जन करण्यासाठी कुकडी नदीचे पात्रात अशोक खंडू गाडगे हा २६ वर्षाचा युवक गेला असता तो पाण्यात बुडून बेपत्ता झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. त्याचा शोध स्थानिक तरुण व पोलीस यंत्रणा करीत आहे. सार्वजनिक गणपतीचे विसर्जन करण्यासाठी तो नदीच्या पात्रात उतरला होता अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. (Latest Pune News)
दरम्यान याबाबतची माहिती स्थानिक नागरिकांनी पोलीस प्रशासनाला दिले असून स्थानिक भिल्ल समाजाचे युवक त्याचा पाण्यामध्ये शोध घेत आहेत तसेच आपत्ती व्यवस्थापनाच्या एनडीआरएफ पथकाला देखील या ठिकाणी पाचारण करण्यात आले असल्याचे स्थानिक तरुणांनी सांगितले.

