Guillain Barre Syndrome: चिंता वाढली! दौंडमधील तरुणाचा जीबीएसमुळे मृत्यू

पुण्यात ‘जीबीएस’च्या रुग्णांची संख्या 211 वर
Guillain Barre Syndrome
चिंता वाढली! दौंडमधील तरुणाचा जीबीएसमुळे मृत्यूPune News
Published on
Updated on

पुणे: राज्यात गुलेन बॅरी सिंड्रोमची (जीबीएस) रुग्ण संख्या घटत असली, तरीही मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. जीबीएसमुळे आज दौंड येथील 37 वर्षे वयाच्या तरूणाचा मृत्यू झाला. काल सिंहगड रस्त्यावरील नांदेड सिटी येथे राहणार्‍या बारामतीतील तरुणीचा मृत्यू झाला होता. अशा पद्धतीने मागच्या दोन दिवसांत दोघांचा मृत्यू झाला आहे. दोघेही जीबीएसचा उपचार घेत होते.

राज्यात आतापर्यंत एकूण मृतांची संख्या 11 झाली आहे. यातील 4 जणांचा जीबीएसने मृत्यू झाल्याचे निश्चित आहे, तर 7 जणांचा संशयित मृत्यू झाला आहे. पुण्यात ‘जीबीएस’च्या रुग्णांची संख्या 211 वर पोचली आहे. आज एकही जीबीएस संशयित रुग्णांची नोंद झाली नाही.

दौंड तालुक्यातील सोनवडी येथील 37 वर्षीय तरुणाला हातांमध्ये अशक्तपणा आल्याने 10 फेब्रुवारीला उपचारासाठी ससून रुग्णालयात भरती केले होते. त्याला 11 ते 13 फेब्रुवारी दरम्यान ’आयव्हीआयजी’ हे औषधांचा डोस दिले. तसेच त्याच वेळी त्याला ‘जीबीएस’चे निदान करण्यात आले. त्याला व्हेंटिलेटर ठेवण्यात आले होते. त्याला अर्धांगवायू झाला होता. त्याला फुप्फुसाचा संसर्ग झाला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news