

बारामती : माझ्या जागेत बाथरूम का बांधले अशी विचारणा करणाऱ्या पुतण्याला चुलता व चुलत भावाने बेदम मारहाण केली. या घटनेत सौरभ विष्णू इंगळे (वय २४) या तरुणाचा मृत्यू झाला. बारामती तालुक्यातील पारवडी येथे बुधवारी (दिं. १०) रात्री उशिरा हा प्रकार घडला. याप्रकरणी बारामती तालुका पोलिसांनी प्रमोद इंगळे व रामचंद्र इंगळे या दोघांना ताब्यात घेतले आहे. (Pune Latest News)
इंगळे वस्ती येथे बाथरूम बांधण्याचे कारणावरून हा प्रकार घडला. प्रमोद व रामचंद्र इंगळे यांनी सौरभ याला बेदम मारहाण केल्यानंतर हे दोघेच त्याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी तालुका पोलीस ठाण्यात येऊन बसले होते.
दरम्यान जखमी सौरभ याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत गंभीर गुन्हे घडण्याची सत्र सुरूच असून गुन्हेगारीला आळा घालण्यात पोलीस ठाणे कुछ कमी ठरल्याचे दिसून येत आहे.