पुणे हादरलं! शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार; स्वारगेट बसस्थानकातील घटना...

नराधमाच्या शब्दावर विश्वास ठेवला अन् तरुणीचा घात झाला
Pune Crime News
पुणे हादरलं! शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार; स्वारगेट बसस्थानकातील घटना...File Photo
Published on
Updated on

Pune Crime News: शिक्षणाचं माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्यातुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे. पुण्यातील स्वारगेट परिसरात ही घटना घडली आहे. पहाटे अंधाराचा फायदा घेत नराधमाने तरुणीवर बलात्कार केला अन् पळ काढला. पोलिसांकडून आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही धक्कादायक घटना पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास घडली आहे. या प्रकारानंतर पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळातच पोलिसांची पथके आरोपीच्या मागावर असून त्याचा शोध घातला जात आहे.

तरुणी पुण्यातून फलटणच्या दिशेने निघाली होती. स्वारगेट एसटी स्टँडच्या परिसरात आल्यानंतर ती एका ठिकाणी थांबली होती. त्यावेळी एका अनोळखी व्यक्तीने तिला फलटणला जाणारी एसटी बस दुसऱ्या ठिकाणी थांबली असल्याची माहिती दिली. माझी एसटी याच ठिकाणी थांबते, तिकडे जाणार नाही असं त्या मुलीने इसमाला सांगितले. मात्र एकट्या मुलीचा फायदा घेत त्या तरुणाने तिला शब्दात अडकवले.

या ठिकाणी ती मुलगी गेल्यानंतर एसटी तर बंद आहे असं सांगितलं. तू टॉर्च लावून आत मध्ये जा हीच एसटी काही वेळात फलटणला निघेल, असं या नराधमाने तिला सांगितले आणि स्वतः सुद्धा बसमध्ये शिरला. त्यानंतर त्याने तिच्यावर जबरदस्ती केली आणि तिथून पसार झाला .घडलेला संपूर्ण प्रकार या मुलीने पोलिसांना सांगितलेला असून पोलिसांची विविध पथक आरोपीचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे पुण्यात मोठी खळबळ उडाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news