Pune Crime News: मसाज सेंटरच्या नावाने वेश्या व्यवसाय; दोन पीडित महिलांची सुटका

येरवडा पोलिसांची कारवाई
Pune Crime News
Pune Crime NewsPudhari
Published on
Updated on

पुणे: उच्चभ्रू परिसर म्हणून ओळख असलेल्या कल्याणीनगर भागातील मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या, वेश्या व्यवसायाचा येरवडा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या वेळी दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून, त्यांना वेश्या व्यवसायात ढकलणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून एकाला ताब्यात घेतले आहे.

ईश्वरधाम अपार्टमेंट जॉगर्स पार्कजवळ कल्याणीनगर येथे निरा स्पा मसाज सेंटर वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक अंजुम बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने बनावट ग्राहक पाठवून खात्री केली. त्या वेळी तेथे वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे समोर आले.

Pune Crime News
Pune Ola Uber Fare: उबेर ॲपकडून कमिशनमध्ये कपात; रिक्षा, टॅक्सीचालकांसह प्रवाशांनाही दिलासा

त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक दिनेशकुमार पाटील, उपनिरीक्षक महेश फटांगरे, शुभांगी चव्हाण, कर्मचारी शैलेश वाबळे, गणेश पालवे, साईनाथ म्हस्के, सुवर्णा साळोखे यांच्या पथकाने छापा टाकून अरमान रहिमउद्दीन हुसेन (वय 21, रा. विमानगर) याला ताब्यात घेतले असून, दोन पीडित महिलांची सुटका केली. याप्रकरणी हुसेन आणि त्याचा सहकारी राज या दोघांविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दोघे आरोपी पीडित महिलांना पैशांचे प्रलोभन दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news